शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

पश्चिम बंगालमध्ये 'संजय राऊत' प्रकरणाची पुनरावृत्ती; भाजपला फायदा होणार की तोटा..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 16:05 IST

cbi questions tmc leader abhishek banerjees wife in coal scam: महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच घडलेल्या घडामोडी आता पश्चिम बंगालमध्ये घडत आहेत.

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election) अवघ्या काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यासोबतच राजकीय नेत्यांकडून पक्षांतरदेखील जोरात सुरू आहे. विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (TMC) आणि भारतीय जनता पक्षात (BJP) थेट संघर्ष होणार आहे. त्याची झलक काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये सध्या घडत असलेल्या घडामोडी महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीच घडल्या आहेत.देवेंद्र फडणवीसांवर नवी जबाबदारी; ‘जय श्री राम’च्या जयघोषात भाजपानं सुरू केली तयारीकेंद्र सरकारकडून तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार केला जातो. पश्चिम बंगालमध्येदेखील सध्या हाच मुद्दा गाजत आहे. कोळसा घोटाळ्यात तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्या पत्नी रुजिरा बॅनर्जी यांना सीबीआयनं (CBI) समन्स बजावलं होतं. आज सीबीआयनं त्यांची दीड तास चौकशी केली. त्यानंतर सीबीआयचं पथक रुजिरा यांच्या घरातून निघालं. रुजिरा यांच्या चौकशीतून सीबीआयला समाधानकारक उत्तरं मिळालेली नाहीत. त्यामुळे सीबीआयकडून पुन्हा रुजिरा यांची चौकशी होऊ शकते."ये बंगाल भाजपा है…और यहा उनकी Pawri हो रही है", TMC ने रिकाम्या खुर्च्यांवरुन लगावला सणसणीत टोलाअभिषेक बॅनर्जींप्रमाणेच राऊत यांच्या पत्नीलाही नोटीसगेल्या वर्षाच्या अखेरीस शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा यांना सक्तवसुली संचलनालयानं (ED) नोटीस बजावली होती. त्यानंतर वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात गेल्या. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पीएमसी बँक घोटाळा प्रकरणात त्यांची चौकशी केली. यावरून महाविकास आघाडी सरकार आणि विशेषत: शिवसेनेनं अतिशय आक्रमक भूमिका घेतली होती. राज्यातलं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ईडीचा वापर होत असल्याचं, ईडी, सीबीआय भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली होती."आधी अभिषेकशी लढा, मग माझा सामना करा"; ममतांचं अमित शहांना खुलं आव्हानपश्चिम बंगालमध्ये महाराष्ट्रासारख्याच घडामोडीअभिषेक बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे भाचे आहेत. ते तृणमूलचे खासदार आहेत. संजय राऊत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय राऊत खासदार आहेत. अभिषेक बॅनर्जी यांच्या पत्नी रुजिरा राजकारणात सक्रिय नाहीत. राऊत यांच्या पत्नी वर्षादेखील राजकारणात सक्रिय नाहीत. शरद पवार, ईडी अन् राज्यात सत्तांतरमहाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीआधी ईडीनं शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव ईडीच्या नोटिशीत आलं होतं. त्यानंतर पवार स्वत:चं ईडीच्या कार्यालयात पोहोचले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर आले. याचा राजकीय लाभ राष्ट्रवादीला झाला. शिवसेना खासदार संजय राऊत आणि पवार यांच्यात याचवेळी बऱ्याच भेटीगाठी झाल्या. त्यानंतर शिवसेनेनं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी, काँग्रेससोबत घरोबा केला आणि सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीSanjay Rautसंजय राऊतCBIगुन्हा अन्वेषण विभागEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवार