नारदा स्टिंग प्रकरण भोवणार, सुवेंदू अधिकारींसह चार खासदार अडकणार; सीबीआय केवळ त्या परवानगीच्या प्रतीक्षेत  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2021 06:04 PM2021-05-19T18:04:21+5:302021-05-19T18:05:36+5:30

BJP leader Suvendu Adhikari News: नारदा स्टिंग प्रकरणामध्ये सीबीआय सध्याचे भाजपा नेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार सुवेंदू अधिकारी यांच्यासह चार नेत्यांवर खटला चालवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे.

CBI seeking permission from lok sabha speaker to file case against BJP leader Suvendu Adhikari & other MPs | नारदा स्टिंग प्रकरण भोवणार, सुवेंदू अधिकारींसह चार खासदार अडकणार; सीबीआय केवळ त्या परवानगीच्या प्रतीक्षेत  

नारदा स्टिंग प्रकरण भोवणार, सुवेंदू अधिकारींसह चार खासदार अडकणार; सीबीआय केवळ त्या परवानगीच्या प्रतीक्षेत  

Next

कोलकाता - नारदा स्टिंग प्रकरणामध्ये सीबीआय सध्याचे भाजपा नेते आणि तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार सुवेंदू अधिकारी यांच्यासह चार नेत्यांवर खटला चालवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी याबाबतची माहिती दिली. तसेच काही लोकांकडून संस्थेविरोधात होत असलेले पक्षपाताचे आरोपही फेटाळून लावले आहेत. (CBI seeking permission from lok sabha speaker to file case against BJP leader Suvendu Adhikari & other MPs)

अधिकाऱ्याने सांगितले की, सीबीआयने सुवेंदू अधिकारी यांच्यासह सौगत रॉय, प्रसून बॅनर्जी आणि काकोली घोष दस्तीदार यांच्यावर खटला दाखल कऱण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे परवानगी मागितली होती. ज्यावेळी हे स्टिंग ऑपरेशन झाले होते. तेव्हा हे चारही नेते तृणमूल काँग्रेसचे खासदार होते. दरम्यान, या प्रकरणात २०१७ मध्ये भाजपामध्ये दाखल झालेल्या मुकुल रॉय यांचे नाव नाही, हेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.  

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी सोमवारी झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सौगत रॉय हे भाजपमाध्ये दाखल झाले असल्याने त्यांना सोडले असा दावा केला होता. तर केंद्रातील भाजपाचे नेते विधानसभा निवडणुकीमधील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आमदार तापस रॉय यांनी केला होता. 

दरम्यान, २०१४ मध्ये हे स्टिंग ऑपरेशन करणारे नारद समाचार पोर्टलचे संपादक मॅथ्यू सॅम्युएल यांनीही अधिकारी यांच्याविरोधात कारवाई का होत नाही आहे, असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच त्यांनी निष्पक्षपाती चौकशीची मागणी केली होती. दरम्यान, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अधीररंजन चौधरी यांनी बंगालमध्ये कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ होत असताना अशा प्रकारे सीबीआयने कारवाई करणे हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. 
 

Web Title: CBI seeking permission from lok sabha speaker to file case against BJP leader Suvendu Adhikari & other MPs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.