शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

व्हॉट्सअ‍ॅप आदेशाद्वारे केली सीबीआय संचालकांची गच्छंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 06:28 IST

सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना घरी बसवण्याचा आदेश मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पाठविण्यात आला.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांना घरी बसवण्याचा आदेश मंगळवारी मध्यरात्र उलटल्यानंतर ‘व्हॉट्सअ‍ॅप’वरून पाठविण्यात आला. पंतप्रधानांकडील कार्मिक व प्रशिक्षण विभागाचे अधिकारी त्या रात्री ११.५५ वाजता वर्मा यांच्या निवासस्थानी गेले. परंतु, सुरक्षारक्षकांनी ‘साहेब झोपले आहेत’, असे सांगून पत्र स्वीकारले नाही. त्यामुळे हा आदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून पाठविण्यात आला.वर्मा यांना आदेश पोहोचेपर्यंत नागेश्वर राव यांना संचालकपदाची सूत्रे स्वीकारणे शक्य नव्हते. शिवाय अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि वर्मा यांच्या कार्यालयाची झडतीही घेता आली नसती. पंतप्रधान कार्यालयापासून ते राष्टÑीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, उपप्रधान सचिव पी.के. मिश्रा आणि कार्मिक व प्रशिक्षण विभागातील अतिरिक्त सचिव लोक रंजन आपापल्या कार्यालयात सर्व काही मार्गी लागेल, अशी आशा बाळगून होते.अजित डोवल यांनी लोक रंजन यांना व्हॉट्सअ‍ॅपवरून आदेश पाठविण्यास सांगितले. पण लोक रंजन यांच्याकडे तेव्हा मोबाइल फोन नसल्याने पीएमओने तो उपलब्ध करून दिला. आदेश पाठवल्यानंतर तो वर्मा यांनी वाचल्याची निळी खूण लोक रंजन यांनी पाहताच पुढच्या हालचालींना वेग आला.त्यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली. आयबीच्या ८ अधिकाºयांच्या पथकाने सीबीआय मुख्यालय गाठून वर्मा आणि अस्थाना यांचे कार्यालय ताब्यात घेतले. वर्मा यांच्या अकराव्या मजल्यावरील कार्यालयाची झडती घेतली. तोवर नागेश्वर राव यांना त्यांच्या कक्षात थांबण्यास सांगण्यात आले होते. आयबीच्या पथकाने वर्मा यांच्या कार्यालयातील संगणकाची हार्ड डिस्क ताब्यात घेतली. तेथील सर्व फायलींच्या फोटोकॉपी काढल्या. उपधीक्षक अजय बस्सी यांच्याकडील सर्व फायलींच्या फोटोकॉपी काढल्या. सह-संचालक ए. के. शर्मा यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेण्यात आली. आयबीचे पथक तेथून बाहेर पडेपर्यंत एकालाही तेथे येऊ दिले नाही.आयबीचे पथक काय शोधत होते, यामागचे गूढ कळले नाही. राफेल सौद्याच्या चौकशीच्या मुद्द्याची सरकारला फारशी चिंता नव्हती. राफेलशी संबंधित दस्तावेज आलोक वर्मा यांनी ए. के. शर्मा यांच्याकडे पाठविले होते. हे दस्तावेज प्रशांत भूषण यांनी सीबीआयला दिले होते.कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क ताब्यात घेतल्यावरून आयबीचे अधिकारी आणखी कशाचा तरी शोध घेत होते, हे निश्चित झाले. गुजरातच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी एस. के. शर्मा यांच्याकडील महत्त्वाचा विभाग काढून घेण्यात आला असा तरी त्यांना दिल्लीबाहेर पाठविालेले नाही, हे उल्लेखनीय. २७ वर्षांपासून राजीव गांधी हत्येप्रकरणी चौकशी करणाºया एमडीएमएचे प्रमुख म्हणून त्यांना कायम ठेवण्यात आले आहे. राकेश अस्थाना यांच्याऐवजी त्यांनी वर्मा यांची बाजू का घेतली, हे अद्याप गूढ आहे.>आयबीच्या अधिकाºयांची पाळतआलोक वर्मा यांना सक्तीने घरी बसवल्यानंतर आणि त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असतानाच, वर्मां यांच्या निवासस्थानाबाहेर बुधवारी मध्यरात्रीपासूनच पाळत ठेवून हेरगिरी करण्याचा प्रयत्न केंद्राकडून झाला, असे दिसते. हे नियमित काम आहे, असे अधिकारी सांगत असले तरी सीबीआय विरुद्ध सीबीआय संघर्षात आयबीच्या चार अधिकाºयांना ताब्यात घेण्यात आले.

टॅग्स :CBIगुन्हा अन्वेषण विभाग