शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

Cauvery Verdict :कर्नाटकवर 'कावेरी' प्रसन्न; तामिळनाडूला मिळणार कमी पाणी; सुप्रीम कोर्टाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 12:38 IST

कर्नाटकला 14.75 टीएमसी अतिरिक्त पाणी मिळणार, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे.

नवी दिल्ली - तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि केंद्रशासित पाँडेचेरीदरम्यान गेल्या काही दशकांपासून सुरू असलेल्या कावेरी पाणीवाटपाच्या वादावर सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी आपला निर्णय दिला आहे. तामिळनाडूला मिळणा-या पाण्यामध्ये कपात करत कर्नाटकला मिळणारा पाण्याचा वाटा कोर्टाकडून वाढण्यात आला आहे. बंगळुरू शहरातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं कोर्टानं स्पष्ट केले आहे. 

कावेरी पाणीवाटपाबाबत सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने शुक्रवारी निर्णय दिला. पाणीवाटप लवादाच्या 2007 मधील निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. या लवादाने तामिळनाडू, कर्नाटक, केरळ आणि पाँडेचेरी यांच्या वाट्याचे पाणी ठरवून दिले होते. मात्र कर्नाटकने पाणी सोडण्यास नकार दिल्याने हा वाद सुप्रीम कोर्टात पोहोचला. अखेर सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी या प्रलंबित प्रकरणावर निर्णय देत कर्नाटकच्या वाट्याचे पाणी 14.75 टीएमसीने वाढवले आहे.

शिवाय,  'नदी ही राष्ट्रीय संपत्ती आहे. एखाद्या राज्यातून उगम पावते म्हणून संबंधित राज्य त्या नदीच्या पाण्यावर पूर्णपणे हक्क सांगू शकत नाही,' असंही खंडपीठानं यावेळी नमूद केले.  कोर्टाच्या या निर्णयामुळे तामिळनाडूला मोठा झटका मिळाला आहे. कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे तामिळनाडून राज्य सरकारनं म्हटले आहे.  

137 वर्षांपासून सुरू असलेल्या कावेरी पाणीवाटपाच्या विवादावरुन कर्नाटक-तामिळनाडू आणि केरळ राज्य आमने-सामने उभे ठाकले आहेत. एआयएडीएमकेनं कोर्टाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. या निर्णयासंबंधी पक्ष पुनर्विचार याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. कोर्टानं दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कर्नाटक-तामिळनाडू सीमेवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. शिवाय, कर्नाटकहून तामिळनाडू येथून येणा-या बसेस सीमारेषेबाहेरच थांबवण्यात आल्या आहेत. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय