दुसऱ्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडला; पाचव्या मजल्यावरुन मारली उडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 12:19 IST2019-05-16T12:16:27+5:302019-05-16T12:19:22+5:30

जीव वाचवण्यासाठी तरुणाची उडी

Caught With A Married Woman Man Jumped From 5th Floor | दुसऱ्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडला; पाचव्या मजल्यावरुन मारली उडी

दुसऱ्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडला; पाचव्या मजल्यावरुन मारली उडी

नवी दिल्ली: दुसऱ्याच्या पत्नीसोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडलेल्या एका तरुणानं पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यात त्याचा मृत्यू झाला. दक्षिण दिल्लीतल्या तिगडी भागात हा प्रकार घडला. या तरुणाला पाचव्या मजल्यावरुन ढकलून दिलं असावं, अशी शंका असल्यानं पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. 

तिगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जे. जे. कॉलनीत एक तरुण दुसऱ्याच्या पत्नीसोबत आढळून आला. महिलेच्या पतीला हा तरुण आक्षेपार्ह स्थितीत सापडला. त्यानंतर त्यानं दोघांना एका खोलीत बंद केलं. याबद्दलचा बभ्रा होऊ नये म्हणून महिलेसोबत असलेल्या तरुणानं पाचव्या मजल्यावरुन उडी मारली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या महिलेचा पती तुघलकाबादमध्ये कस्टम क्लियरन्स एजंटसोबत काम करतो.  

मृत तरुणाचं नाव पंकज (29) असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विजय कुमार यांनी दिली. 'पंकज जे. जे. कॉलनीमधल्याच पांडव नगरमध्ये राहतो. तर 32 वर्षांची महिला तिच्या पतीसोबत जे. जे. कॉलनीतल्या एका इमारतीत वास्तव्यास आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेचार-पावणेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. याची माहिती पोलिसांना साडेपाचला मिळाली,' असं कुमार यांनी सांगितलं. ही हत्या असल्याचं प्राथमिक तपासातून सिद्ध झालेलं नाही. पाचव्या मजल्यावरुन उडी मारल्यानं पंकजचा मृत्यू झाल्याचं तपासातून समोर आलं आहे. मात्र या प्रकरणाचा आणखी तपास सुरू असल्याचं ते म्हणाले. 
 

Web Title: Caught With A Married Woman Man Jumped From 5th Floor