शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
3
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
4
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
5
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
6
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  
7
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
8
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
9
गुगल वॉलेटची भारतात एंट्री! जाणून घ्या 'Google Pay'पेक्षा किती वेगळी असेल
10
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
11
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
12
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
13
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
14
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
15
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
16
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
17
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
18
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
19
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
20
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?

Casting Couch: संसदही कास्टिंग काऊचला अपवाद नाही- रेणुका चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 4:16 PM

सरोज खान यांच्यानंतर रेणुका चौधरी यांचं धक्कादायक विधान

नवी दिल्ली: बलात्कार आणि कास्टिंग काऊचवरुन प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी वादग्रस्त विधान केल्यावर आता यावरुन सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणावर काँग्रेस नेत्या रेणुका चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. 'प्रत्येक ठिकाणी कास्टिंग काऊच होतं. संसददेखील याला अपवाद नाही,' असं चौधरी यांनी म्हटलंय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कास्टिंग काऊच प्रत्येक क्षेत्रात होतं, असंही चौधरींनी म्हटलंय.कास्टिंग काऊच फक्त चित्रपटसृष्टीत होतं असं नाही. असे प्रकार प्रत्येक क्षेत्रात होताहेत आणि हे कटू सत्य आहे, असं रेणुका चौधरी यांनी म्हटलं. 'संसदेत किंवा अन्य ठिकाणी असे प्रकार होत नाहीत, असं समजू नका. सध्या याबद्दल आवाज उठवला जात आहे. अनेकजणी कास्टिंग काऊचविषयी धैर्यानं बोलत आहेत. त्यांच्यावर झालेला अन्याय समोर येऊन सांगत आहेत,' असंही रेणुका चौधरी म्हणाल्या. सरोज खान यांनी बलात्कार आणि कास्टिंग काऊचबद्दल केलेल्या विधानानं सध्या खळबळ माजली आहे. चित्रपटसृष्टीत बलात्कार आणि कास्टिंग काऊच होतं असलं, तरी इथे रोजगारही मिळतो, असं खान यांनी म्हटलं होतं. ज्यांच्यासोबत असं घडतं त्यांना चित्रपटसृष्टीत सोडून देत नाही. उलट त्यांना काम दिलं जातं, असंही त्या म्हणाल्या. सरोज खान यांच्या विधानानं मोठा वाद झाला. त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकाही झाली. यानंतर त्यांनी त्यांच्या विधानाबद्दल माफी मागितली.  

टॅग्स :Casting Couchकास्टिंग काऊचSaroj Khanसरोज खान