शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानातही होणार जातनिहाय जनगणना; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 08:37 IST

राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. गेहलोत यांच्याशिवाय या बैठकीला राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर रंधावा, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि इतर नेते उपस्थित होते. 

जयपूर : बिहारच्या धर्तीवर राजस्थानात जातनिहाय जनगणना करण्यात येईल, अशी घोषणा राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी केली. राजस्थानात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही घोषणा करण्यात आली आहे. 

राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर चर्चा करण्यात आली. गेहलोत यांच्याशिवाय या बैठकीला राजस्थानचे काँग्रेस प्रभारी सुखजिंदर रंधावा, प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि इतर नेते उपस्थित होते. 

बैठकीनंतर गेहलोत म्हणाले,काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जातनिहाय जनगणनेची आणि लोकसंख्येच्या प्रमाणात सहभागाची संकल्पना राज्यात पुढे नेली जाईल. त्यासाठी जातनिहाय जनगणना करणार आहोत.

काम किया दिल से, काँग्रेस फिर से...गेहलोत म्हणाले की, देशात विविध जाती, धर्माचे लोक राहतात. विविध जातीचे लोक वेगवेगळ्या नोकऱ्या करतात. कोणत्या जातीची लोकसंख्या किती आहे, हे कळल्यास  त्यांच्यासाठी आपण काय योजना आखल्या आहेत हे कळू शकेल. जातनिहाय योजना तयार करणे आमच्यासाठी सोपे जाईल. त्यावरून राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा म्हणाले की, काम किया दिल से, काँग्रेस फिर से, हे विधानसभा निवडणूक प्रचाराचे घोषवाक्य असेल.

काँग्रेसने काहीच केले नाही : ज्योतिरादित्यकाँग्रेसने मागील ७० वर्षांत मागासवर्गीयांसाठी काहीही केले नाही, उलट त्यांच्या आरक्षणाला विरोधच केला, अशी टीका केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केली. मोरारजी देसाई पंतप्रधान असताना आयोगाचा (मागासवर्गीय विषयक) अहवाल सादर झाला, तेव्हा काँग्रेसने त्यास विरोध केला. व्ही. पी. सिंग सरकारच्या काळात मागासवर्गीयांच्या आरक्षणाची अंमलबजावणी झाली, तेव्हाही काँग्रेसने विरोध केला, असे सिंधिया यावेळी म्हणाले.

‘अहवालानंतरच जातीय जनगणनेबाबत निर्णय’  मागासवर्ग आयोगाचा अहवाल नोव्हेंबरमध्ये प्राप्त झाल्यानंतर जातनिहाय जनगणना सार्वजनिक करण्याबाबत विचार करू, असे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. जातनिहाय जनगणनेची माहिती सार्वजनिक करण्यासाठी त्यांच्या सरकारवर दबाव वाढत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष के. जयप्रकाश नोव्हेंबरमध्ये हा अहवाल सरकारला सादर करणार आहेत. 

 

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा