भारतात दोन टप्प्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना; १ मार्च २०२७ मध्ये होणार सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:27 IST2025-06-05T12:23:41+5:302025-06-05T12:27:09+5:30

बर्फाळ प्रदेशासाठी ऑक्टोबर २०२६चा मुहूर्त

Caste-wise census to be conducted in India in two phases; to begin on March 1, 2027 | भारतात दोन टप्प्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना; १ मार्च २०२७ मध्ये होणार सुरुवात

भारतात दोन टप्प्यांमध्ये होणार जातनिहाय जनगणना; १ मार्च २०२७ मध्ये होणार सुरुवात

चंद्रशेखर बर्वे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जातींच्या आकडेवारीसह जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्च २०२७ पासून सुरू होणारी जनगणना दोन टप्प्यांत पूर्ण केली जाणार आहे.

केंद्र सरकारने १५ वर्षांपासून प्रलंबित जनगणना करण्याचा मुहूर्त काढला आहे. २१ महिन्यांनंतर अर्थात १ मार्च २०२७ पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. यावेळी फॉर्ममध्ये जातीचाही कॉलम राहणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पाडली जाईल, असे गृह मंत्रालयाकडून आज जाहीर करण्यात आले आहे. हिमवृष्टीचा सामना करावा लागणाऱ्या जम्मू, काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशासह उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये ऑक्टोबर २०२६ पासून जनगणनेला सुरुवात होईल. जनगणना कायदा १९४८ च्या कलम ३ च्या तरतुदीनुसार, अधिसूचना अधिकृत राजपत्रात तात्पुरती १६ जून २०२५ रोजी प्रकाशित केली जाईल.

२०११ मध्ये लोकसंख्येत झाली १७.६४% वाढ

शेवटची जनगणना २०११ मध्ये करण्यात आली होती आणि ती सुद्धा दोन टप्प्यांत झाली होती. पहिल्या टप्प्यात घरांची यादी (१ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०१०) आणि दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्येची (०९ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी २०११) माहिती गोळा 
करण्यात आली होती.

२०११ मध्ये देशाची लोकसंख्या

  • १ अब्ज २१ कोटी ०८ लाख ५४ हजार ९७७ एवढी होती.
  • आधीच्या जनगणनेनुसार त्यात १७.६४ टक्क्यांनी वाढ झाली होती.
  • २०११ मध्ये सर्वाधिक लोकसंख्या (१९९,८१२,३४१) असलेले राज्य उत्तर प्रदेश होते.
  • सर्वांत कमी (६४,४७३) लोकसंख्या लक्षद्वीपमध्ये होती.


एक अब्ज ४६ कोटी

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्यू या संस्थेनुसार, या वर्षाच्या शेवटी भारताची लोकसंख्या १.५ अब्जपर्यंत पोहोचेल. भारतात एका दिवसात ६३,१७१ मुले जन्माला येतात तर मरणाऱ्यांची संख्या २६,६०४ आहे.

Web Title: Caste-wise census to be conducted in India in two phases; to begin on March 1, 2027