शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशात मतदानापूर्वी भाजपा नेत्याच्या कारमध्ये सापडली कॅश, काँग्रेसकडून रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 21:52 IST

सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याने यावेळी  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीच्या वातावरणात प्रचार झाला.  

इंदूर - सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत असल्याने यावेळी  मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीच्या वातावरणात प्रचार झाला.  प्रचार समाप्त झाल्यानंतर नेतेमंडळींनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी वैध-अवैध मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली असून, मतदानाला एक दिवस शिल्लक असताना राज्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते देवराज सिंह परिहार यांच्या वाहनामध्ये रोख रक्कम सापडली आहे. पोलिसांनी ही रक्कम जप्त केली आहे. मात्र पोलिसांनी सत्ताधारी भाजपाच्या दबावामुळे देवराज सिंह यांना घटनास्थळावरून जाऊ दिले. असा आरोप करत काँग्रेसने रास्ता रोको केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते असलेले देवराज सिंह परिहार हे राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे उपाध्यक्ष आहे. त्यांना मध्य प्रदेश सरकारने राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला आहे. पोलीस अधिकारी मानसिंह परमार यांनी सांगितले की, सांवेर विधानसभा मतदारसंगातील हतुनिया फाटा येथे परिहार यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्यात 2 लाख 6 0 हजार रुपये आढळले.  पोलीस घटनास्थळी चौकशी करत असतानाच काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. तसेच त्यांनी परिहार यांच्या वाहनाला घेराव घालून आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या लागल्या. तिथे निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणाचा फायदा घेऊन परिहार आणि त्यांचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार झाले. असा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, परिहार हे मतदारांना पैसे देऊन आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते निलाब शुक्ता यांनी केला आहे.   

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाPoliticsराजकारणPoliceपोलिसcongressकाँग्रेस