केरळच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लिखाण करणाऱ्या 119 जणांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 18:11 IST2019-06-13T18:11:33+5:302019-06-13T18:11:33+5:30
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये १२ राज्य सरकराचे तर एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.

केरळच्या मुख्यमंत्र्यांविरोधात लिखाण करणाऱ्या 119 जणांवर कारवाई
नवी दिल्ली - सोशल मिडीयावर ट्रोल करणे किंवा वादग्रस्त लिखाणे करण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यातच, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त लिखाण केल्याप्रकरणी तीन वर्षात119 जणांवर पोलीस कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे केरळच्या गृहविभागाने ही आकडेवारीही प्रसिद्ध केली आहे.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल सोशल मिडीयावर वादग्रस्त मजकूर प्रसिद्ध केल्याबद्दल एका पत्रकारास अटक करण्यात आली होती, मात्र न्यायालयाने पत्रकाराला तत्काळ सोडण्याचे आदेश दिले होते. ही घटना ताजी असतानाच आता, केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांच्याबद्दल सोशल मिडीयावर आक्षेपार्ह आणि वादग्रस्त लिखाण केल्याप्रकरणी तीन वर्षात119 जणांवर पोलीस कारवाई करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. केरळ विधानसभेच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये १२ राज्य सरकराचे तर एका केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे. यावरून केरळ विधानसभेचे विरोधीपक्ष नेते रमेश चेन्नितला यांनी विजयन यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्याविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीवर थेट कारवाई केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.