‘आदिपुरुष’विरुद्ध अमृतसर काेर्टात खटला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 06:04 IST2023-06-21T06:04:29+5:302023-06-21T06:04:51+5:30
हेमप्रकाश यांच्या मते भगवान श्री वाल्मिकींनी रचलेल्या रामायणात ‘आदिपुरुष’मध्ये छेडछाड करण्यात आली आहे.

‘आदिपुरुष’विरुद्ध अमृतसर काेर्टात खटला दाखल
- बलवंत तक्षक
चंडीगड : पंजाबमधील अमृतसरच्या न्यायालयात ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारांविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. भगवान वाल्मिकी वारसेनेचे प्रमुख हेमप्रकाश यांनी चित्रपटाचे निर्माते भूषणकुमार, कृष्णकुमार, दिग्दर्शक ओम राऊत, संवाद लेखक मनोज मुंतशीर, अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांच्यावर हा गुन्हा दाखल केला आहे.
हेमप्रकाश यांच्या मते भगवान श्री वाल्मिकींनी रचलेल्या रामायणात ‘आदिपुरुष’मध्ये छेडछाड करण्यात आली आहे. चित्रपटात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचाही आरोप आहे. पवित्र रामायणातील पात्रांचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते दोषी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यावेळी अमृतसरच्या उपायुक्तांना लेखी तक्रारही देण्यात आली; मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही.