शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनविरोधातील खटला बंद, सर्वोच्च न्यायालयाने दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 15:46 IST

सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी सदगुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील याचिका रद्द केली आहे.

Jaggi Vasudev Isha Foundation : दोन मुलींना ओलीस ठेवल्याप्रकरणी सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाऊंडेशनविरुद्धचा खटला सर्वोच्च न्यायालयाने बंद केला आहे. कोइम्बतूर येथील ईशा फाऊंडेशन परिसरात आपल्या दोन मुलींना ओलीस ठेवल्याचा आरोप करत एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, दोन्ही मुली प्रौढ आहेत आणि त्यांनी स्वेच्छेने, कोणत्याही दबावाशिवाय आश्रमात राहत असल्याचे म्हटले आहे.

ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख सद्गुरु जग्गी वासुदेव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. ईशा फाऊंडेशनच्या आवारात आपल्या दोन मुलींना ओलीस ठेवल्याचा आरोप करणाऱ्या एका व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी बंद केली. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले की, मद्रास उच्च न्यायालयाने अशा याचिकेवर चौकशीचे आदेश देणे योग्य नाही. पोलिसांनी आश्रमावर टाकलेला छापाही चुकीचा होता. दोन्ही मुली प्रौढ असल्याचे न्यायालयाने सांगितले. जेव्हा त्या आश्रमात गेल्या, तेव्हा दोघीही 27 आणि 24 वर्षांच्या होत्या. त्या स्वतःच्या इच्छेने आश्रमात राहत आहेत. या निर्णयाचा परिणाम या प्रकरणापुरता मर्यादित राहील, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशाला सद्गुरूंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेनिवृत्त प्रोफेसर एस कामराज यांनी फाऊंडेशनच्या विरोधात मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कामराज यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेत आपल्या मुली लता आणि गीता यांना ईशा फाऊंडेशनच्या आश्रमात ओलिस ठेवण्यात आल्याचा आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने आश्रमाविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. मद्रास उच्च न्यायालयाने 30 सप्टेंबर रोजी सांगितले होते की, पोलिसांनी ईशा फाऊंडेशनशी संबंधित सर्व गुन्हेगारी प्रकरणांचे तपशील सादर करावेत.

CJI दोन्ही मुलींशी बोलले दुसऱ्या दिवशी, म्हणजे 1 ऑक्टोबरला सुमारे 150 पोलिस तपासासाठी आश्रमात पोहोचले. उच्च न्यायालयाच्या आदेशाला सद्गुरूंनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानंतर 3 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या फाउंडेशनविरुद्ध पोलिस तपासाच्या आदेशाला स्थगिती दिली होती. दरम्यान, या प्रकरणावर टिप्पणी करताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी दोन्ही तरुणींशी चर्चा केल्यानंतरच आदेश जाहीर केला. सरन्यायाधीशांशी चर्चेदरम्यान, मुलींनी आश्रमात स्वत:च्या इच्छेने राहत असल्याचे सांगितले. 

टॅग्स :Jaggi Vasudevजग्गी वासुदेवSupreme Courtसर्वोच्च न्यायालय