भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा करुण अंत
By Admin | Updated: December 25, 2014 23:30 IST2014-12-25T23:30:44+5:302014-12-25T23:30:44+5:30
नागपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते.

भरधाव वाहनाच्या धडकेत तरुणाचा करुण अंत
न गपूर : भरधाव टाटाएस वाहनाने धडक दिल्यामुळे अक्षय योगेश सोनपिंपळे (वय २१, रा. अंतुजीनगर, भांडेवाडी) या तरुणाचा करुण अंत झाला. आज रात्री ८ च्या सुमारास भांडेवाडी टी पॉईंटजवळ हा अपघात घडला. त्यामुळे अपघातस्थळी काही काळ तणावाचे वातावरण होते.पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय सोनपिंपळे मोटरसायकलने जात होता. भरधाव टाटा एसच्या चालकाने त्याला जोरदार धडक मारली. त्यामुळे सोनपिंपळे गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. नंदनवन पोलिसांनी या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल केला नव्हता.----