स्वत:ला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा
By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:03+5:302014-12-25T22:41:03+5:30

स्वत:ला आवडेल त्या क्षेत्रात करिअर करा
>अविनाश धर्माधिकारी : १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरफोटो - व्हीमंगशे : लोकमत युवा नेक्स्ट नावानेफोटो कॅप्शन - विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माजी प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी, रमेश बक्षी व इतर. शिबिरात उपस्थित विद्यार्थी.नागपूर : इंजिनिअरिंग, मेडिकल, मॅनेजमेंट, सीए या अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा कल वाढला आहे. हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे समजले जाते. मात्र विद्यार्थ्यांमध्ये या अभ्यासक्रमासंदर्भात रुची नसेल, मित्रांच्या अथवा पालकांच्या दबावात विद्यार्थी या क्षेत्राची निवड करीत असतील, तर त्या विद्यार्थ्याचे करिअर धोक्यात राहील. त्यामळे विद्यार्थ्याने सर्वप्रथम आपली योग्यता, परिश्रम करण्याची तयारी, आवड हे लक्षात घेऊन त्यादृष्टिकोनातून करिअरची निवड करावी, असा सल्ला निवृत्त प्रशासकीय अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. लोकमत युवा नेक्स्ट, भारतीय विद्या प्रसारक संस्था व झुलेलाल इन्स्टट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने नुतन भारत कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वक्ता व मार्गदर्शक म्हणून अविनाश धर्माधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले की, करिअर निवडण्यापूर्वी विद्यार्थ्यांने स्वत:चे आत्मपरिक्षण करावे. आपली योग्यता व आवडीच्या करिअरची निवड केल्यास १०० टक्के यशाची खात्री आहे. दोन दिवसीय शिबिराच्या पहिल्या दिवशी झुलेलाल इन्स्टट्यिूटचे चेअरमन महेश साधवानी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षण संचालक जे. एम. अभ्यंकर, विशेष अतिथी म्हणून आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, आमदार अनिल सोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विद्या प्रसारक संस्थेचे सचिव रमेश बक्षी यांनी केले. संचालन वंदना बळवाईक, आभार प्रदर्शन प्राचार्य वीणा खोतपाल यांनी केले. कार्यक्रमाला किरण गडकरी, जीवन गोडे, मनोज वखरे, एम. प्रधान, हारोडे, दुबे उपस्थित होते. शिबिराला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष बी.एम. शास्त्री, उपाध्यक्ष मिलिंद महाजन, सहसचिव अतुल गाडगे, डब्ल्यू. जी. चोरघडे, के. डी. पत्तरकिने, ए. के. मोने, पी.आर. लिमसे, पी. के. चिंचघरे यांचे सहकार्य लाभले.