शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कार चालकाने रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही, पोलिसांनी ठोठावला 10 हजारांचा दंड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 13:44 IST

रुग्ण घेऊन जाताना किंवा रुग्णाला आणायला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे.

रुग्ण घेऊन जाताना किंवा रुग्णाला आणायला जाणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतरही रुग्णवाहिकेला रस्ता देणे गरजेचे असते. असे न केल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. मात्र, यानंतरही काही लोक अनेकदा रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता देताना दिसून येत नाहीत. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये असेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एका कार चालकाने रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही. यानंतर पोलिसांनी कार चालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील बरठीं मुख्य चौकातून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने पोलिसांनी कार मालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून चौकात ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कार चालकाला कार हटवण्यास सांगितले, मात्र त्याने ती हटवली नाही. यानंतर कार मालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

एकीकडे कार चालक रुग्णवाहिकेला रस्ता देत नव्हता. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच, समजावूनही ते मान्य झाले नाहीत. यादरम्यान, रुग्ण जवळपास 15 मिनिटे रुग्णवाहिकेत वेदनेने ओरडत राहिला. मात्र, त्यानंतरही कार चालकाने काहीही ऐकून घेतले नाही. तलाई पोलीस ठाण्याच्या प्रभारी अमिता यांनी सांगितले की, रस्त्यावर कार पार्क करणे आणि रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने कार चालकाला दंड ठोठावण्यात आला आहे.

रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्यास 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद!दरम्यान, 2019 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटार वाहन (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले होते, ज्या अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली होती. मोटार वाहन कायद्याच्या कलम 196 ई अंतर्गत, रुग्णवाहिकेचा मार्ग रोखणाऱ्या कोणत्याही वाहनावर 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती, जी पूर्वी 100 रुपये होती. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेश