Amarinder Singh: 'सिद्धूंना जितकं लवकर काँग्रेस काढून टाकेल तितकं चांगलं', कॅप्टन अमरिंदर स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 20:30 IST2021-10-20T20:28:26+5:302021-10-20T20:30:24+5:30
Amarinder Singh On Navjot Singh Sidhu: पंजाबमधील राजकीय 'दंगल' अद्याप सुरूच असून रोज नवनवे आरोप-प्रत्यारोप आणि घटना समोर येत आहेत.

Amarinder Singh: 'सिद्धूंना जितकं लवकर काँग्रेस काढून टाकेल तितकं चांगलं', कॅप्टन अमरिंदर स्पष्टच बोलले!
Amarinder Singh On Navjot Singh Sidhu: पंजाबमधील राजकीय 'दंगल' अद्याप सुरूच असून रोज नवनवे आरोप-प्रत्यारोप आणि घटना समोर येत आहेत. गेल्या महिन्यात मुख्यमंत्रीपदावरुन पायऊतार झाल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) यांनी मंगळवारी नवा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली. पंजाबसाठी यापुढेही काम करत राहणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली. जोवर सिद्धू काँग्रेसमध्ये आहेत तोवर पक्ष आणखी तळाला जाईल, असं अमरिंदर म्हणाले.
माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यात त्यांनी आपण यापुढेही पंजाबसाठी काम करत राहणार असल्याचं सांगत लढा असाच सुरू राहिल असं विधान केलं. पंजाबचा पुढचा मुख्यमंत्री कोण याबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, "मला खुर्चीचा मोह नाही. मी पक्षाला याआधीच स्पष्ट केलं होतं की निवडणुकीनंतर मी मुख्यमंत्री होणार नाही. निवडणुकीनंतर निवृत्तीबाबतही माझं पक्षाशी बोलणं झालं होतं. पक्षाला माझं काम पसंत होतं"
नवज्योत सिंग सिद्धू यांना काँग्रेस पक्ष जितकं लवकर पक्षाबाहेरचा रस्ता दाखवेल तितकं पक्षासाठी चांगलं ठरेल. सिद्धंमुळे पक्ष आणखी तळाला जाईल, असंही रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत बोलताना अमरिंदर यांनी शेतकऱ्यांशी चर्चेतूनच मार्ग निघू शकतो, असं म्हटलं आहे.