शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election Results 2022 : "पक्षनेतृत्व कधीही शिकणार नाही," पंजाब निवडणुकांच्या निकालानंतर अमरिंदर सिंग यांचा काँग्रेसवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 09:14 IST

Punjab Election Results 2022 : पंजाबच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मोठा झटका लागला आहे. यापूर्वी काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री कॅप्ट. अमरिंदर सिंग यांच्यावर साधला होता निशाणा.

Punjab Election Results 2022 : पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल नुकतेच लागले. पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये पंजाब वगळता सर्व राज्यांमध्ये भाजपनं मुसंडी मारली. तर दुसरीकडे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला (Aam Admi Party) बहुमत मिळालं आहे. पंजाबमध्ये यावेळी अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये एक नाव पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचंही नाव आहे. त्यांचा पक्ष पंजाब लोक काँग्रेसलाही या निवडणुकीत चांगली कामगिरी करता आली नाही. याशिवाय त्यांनी साडेचार वर्षांच्या कालावधीत केलेल्या आरोपांमुळे पक्षाला नुकसान झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. परंतु आता अमरिंदर सिंग यांनीदेखील याला प्रत्युत्तर दिलं असून पक्ष नेतृत्व यातून कधीही शिकणार नसल्याचं म्हणत निशाणा साधला.

गेल्या वर्षी कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदावरून हटवण्यात आलं होतं. त्यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर त्यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपुरात पक्षाच्या पराभवासाठी कोण जबाबदार आहे असा सवालही केला. "काँग्रेसचं नेतृत्व कधीही शिकणार नाही. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या लाजीरवाण्या पराभवासाठी कोण जबाबदार आहे. मणिपुर, गोवा, उत्तराखंडबाबत काय? उत्तर एकदम स्पष्ट आहे. परंतु नेहमीप्रमाणेच ते समजणार नाहीत," असं ट्वीट अमरिंदर सिंग यांनी केलं.

सुरजेवाला यांनी केली होती टीका"पंजाबमध्ये काँग्रेसनं एका सामान्य पार्श्वभूमी असलेल्या चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री बनवलं होतं. परंतु अमरिंदर सिंग यांच्या जवळपास साडेचार वर्षांच्या कार्यकाळात जी सत्ता विरोधी लाट होती, त्यानं पक्षाला नुकसान झालं. पंजाबमध्ये लोकांनी बदलासाठी मतदान केलं आणि विजेत्यांना शुभेच्छा देतो. आम्ही उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपुर आणि गोव्यात चांगल्या निवडणुका लढल्या. परंतु आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही. यातून आम्हाला शिकायला हवंय आणि आणखी मेहनत करायला हवी," असं काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला म्हणाले.

टॅग्स :Punjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२congressकाँग्रेसAAPआप