शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

7 लोकांचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद, सात दिवसांपासून सुरू होते वनविभागाचे सर्च ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 14:28 IST

Cannibal Leopard Was Imprisoned In A Cage:बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने 8 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमरे लावले होते

ठळक मुद्दे 4 जिल्ह्यातील पथकं घेत होती या बिबट्याचा शोध

उदयपूर: उदयपूर जिल्ह्यात दहशत पसरवणारा बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकला. जिल्ह्यातील जावर माइन्स परिसरात मागील 3 महिन्यात 7 लोकांचा बळी या बिबट्याने घेतला होता. वनविभागाचे 80 पेक्षा जास्त अधिकारी 7 दिवसांपासून या बिबट्याचा शोध घेत होते. आज अखेर हा बिबट्या वनविभागाच्या जाळ्यात अडकला.

4 जिल्ह्यातील पथकं घेत होती शोध

या बिबट्याला पकडण्यासाठी मागील सात दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू होते. यासाठी उदयपूरसह जयपूर, राजसमंद आणि चित्तौडगडवरुन विशेष पथक बोलवण्यात आले होते. ही पथक चोवीस तास बिबट्याच्या शोधात जंगलात फिरत होती. विशेष म्हणजे, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने 8 पिंजरे, 20 ट्रॅप कॅमरे लावले होते. यांनाही बिबट्या चकवा देत होता. पण, आज अखेर बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकला.

गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास 

बिबट्याला पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. जावर माइन्स परिसरात राहणाऱ्या हरिरामने सांगितले की, या बिबट्याच्या दहशतीमुळे गावात राहणे अवघड झाले होते. पण, आता त्याला पकडल्यामुळे आम्ही मोकळेपणाने फिरू शकतो.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभागforestजंगल