शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना पार्टी ‘फंड’ची प्रतीक्षा काँग्रेस, राकॉचे हातवर : भाजपा, शिवसेनेकडून अपेक्षा

By admin | Updated: February 15, 2017 21:03 IST

उमेदवारांना पार्टी ‘फंड’ची प्रतीक्षा काँग्रेस, राकॉचे हातवर : भाजपा, शिवसेनेकडून अपेक्षा

अमरावती : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक रिंगणात प्रमुख पक्षांचे तिकिट घेऊन उतरलेल्या अधिकृत उमेदवारांना आता पार्टी ‘फंड’ चे वेध लागले आहे. त्यासाठी पक्षाच्या नेते-प्रमुखांकडे वारंवार विचारणा केली जात आहे. त्यातही सत्तेत असल्याने भाजपा व शिवसेनेकडून त्यांच्या उमेदवारांना अधिक अपेक्षा आहेत.कोणत्याही निवडणुका म्हटल्या की आधी पैशाचा मुद्दा येतो. निवडणूक खर्चिक झाल्याचे पाहून कोणताही पक्ष इच्छुकांना तुझी अश्वशक्ती किती हा पहिला प्रश्न केला जातो. उमेदवारी मागणाराही आपल्यातील प्लस पॉर्इंट सांगताना पहिल्यांदा अश्वशक्तीच किती ते सांगतो. कार्यकर्ता कितीही निष्ठावान, प्रामाणिक व लोकप्रिय असेल आणि त्यांची अश्वशक्ती नसेल तर त्याला तिकिट नाकारले जाते.त्याचवेळी अन्य गुण नसताना केवळ अश्वशक्तीच्या बळावर खेचून आणल्याचीही उदारणे आहेत. परंतु सर्वच उमेदवारांसाठी अश्वशक्ती हा निकष लागू होत नाही. मग अशा उमेदवारांना पार्टी ‘फंड’ ची अपेक्षा असते. जिल्हा परिषद व पंचायत सतिमीच्या निवडणूक रिंगणात उतरलेल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या नजरा सध्या पार्टी फंड वर लागलेल्या आहेत. कॉग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत नाही आणि नेते मंडळी खिशात हात घालण्यास तयार नसल्याने उमेदवारांना फार काही अपेक्षा नाहीत. नेत्यांनी पार्टी फंड बाबत तसेही हात वर केलेच आहे.खरा प्रश्न आहे तो सत्तेत असलेल्या भाजपाचे राज्यमंत्री व आमदार आहेत. त्यामुळे या नेत्याकडे पक्षाचे उमेदवार पार्टी फंडसाठी मोठया अपेक्षेने पाहत आहेत. सेनेचा एकही आमदार नाही. खासदारांवर खरी भिस्त आहे. त्यामुळे पक्षाच्या उमेदवारांना मिळेल त्या पार्टी फंडवर समाधान मानावे लागणार आहे. आता नेते या उमेदवारांना किती लाभ देतात यावर निवडणुकीतील जय- पराजयाचे गणित गणित अवलंबून आहे.(प्रतिनिधी)पैशाशिवाय कार्यकर्ता पाय पुढे सरकवत नाहीपूर्वी घरच्या भाकरी बांधून कार्यकर्ते प्रचार करायचे, त्या निवडणुकांमध्ये पैसा हा विषय गौण होता. परंतु आता दिवस पालटले आहेत. पैशाशिवाय कार्यकर्ता पाय पुढे सरकवत नाही. एकदा निवडून आल्यावर नेता आपली किमान पाच वर्षाची सोय लावतो.याची जाणीव झाल्याने कार्यकर्र्ते हूशार झाले आहेत. निवडणूकीकडे संधी म्हणून कार्यकर्र्ते पाहत आहेत. प्रचारासाठी वातानुकुलीत गाडी, चहा-पानाचा खर्च, दुपारचे जेवण आणि रात्रीची सोय एवढया किमान अटी कार्यकर्त्यांच्या आहेत. त्यातही उमेदवाराचा प्रचार करतील याची हमी नाही. अनेकदा प्रचारासाठीच्या गाडया ढाब्यावर तासनतास आराम करतात.