शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

अमित शहांचा उमेदवारी अर्ज रद्द करा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे धाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 13:42 IST

भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.

अहमदाबाद - भाजपाध्यक्षअमित शहा यांच्या उमेदवारी अर्जावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. अमित शहा यांनी आपल्या उमेदवारी अर्जामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप करत  त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे. अमित शहा हे गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून रिंगणात उतरले असून,  काँग्रेसने त्यांच्याविरोधात सी.जे. चावडा यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना अमित शहा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये काही माहिती लपवल्याचा आरोप करत काँग्रेसने याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. अमित शहा यांनी आपल्या शपथपत्रामध्ये दोन ठिकाणी चुकीची माहिती दिली, असा दावा काँग्रेसने केला आहे. अमित शहा यांनी गांधीनगरमध्ये असलेल्या एका प्लॉटबाबत आणि मुलाच्या कर्जाबाबत योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

अमित शहा यांनी आपल्या  मालमत्तेची किंमत कमी दाखवल्याचा आरोप काँग्रेसने प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्ताचा हवाला देत केला आहे. शहांच्या मालमत्तेची किंमत सरकारी निकषांनुसार 66.5 लाख एवढी आहे. मात्र त्यांनी या मालमत्तेची किंमत केवळ 25 लाख रुपये दाखवली आहे.  तसेच अमित शहा यांनी मुलगा जय शहा यांच्या कंपनीसाठी आपली संपत्ती गहाण ठेवून 25 कोटींचे कर्ज घेतले होते. त्याचाही उल्लेख या शपथपत्रात नसल्याचा आरोप काँग्रेस उमेदवार सी. जे. चावडा यांनी केला. मात्र भाजपा प्रवक्ते भरत पांड्या यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. विरोधी पक्ष आणि त्यांचे उमेदवार अमित शहा यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत.  शहा यांनी कर्ज चुकते केले असून, गहाण ठेवलेली संपत्ती परत मिळवली आहे. काँग्रेस कुठलीही पडताळणी केल्याशिवाय आरोप करत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.   

टॅग्स :Amit Shahअमित शहाBJPभाजपाgandhinagar-pcगांधीनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकGujarat Lok Sabha Election 2019गुजरात लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग