शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
2
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
3
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
4
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
5
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
6
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
7
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
8
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
9
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
10
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
11
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
12
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
13
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
14
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
15
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
16
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
17
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
18
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
19
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
20
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल

Shame...दिव्यांगांच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्र्याची 'पाय तोडण्याची' धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:19 AM

दिव्यांगांच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहिलेल्या या केंद्रीय मंत्र्यानं एका व्यक्तीला चक्क पाय तोडण्याचीच धमकी दिली.

नवी दिल्ली - भाजपाचे नेते, मंत्री बेलात तसंच वादग्रस्त विधाने करुन वाद अंगावर ओढवून घेत असल्याची मालिकाच गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचं चित्र आहे. या यादीत आता केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या नावाचाही समावेश झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांगांसाठीच्या कार्यक्रमादरम्यान बाबुल सुप्रियो यांनी एका व्यक्तीला चक्क पाय तोडण्याचीच धमकी दिली. हे वादग्रस्त विधान करुन सुप्रियो यांनी नवीन वाद निर्माण केला आहे. 

दिव्यांगांना व्हीलचेअर तसंच अन्य साहित्य वाटप करण्यासाठी आसनसोल येथे एका शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांमधील एक व्यक्ती सतत हालचाल करत होता. त्याच्या सततच्या हालचाली करण्यावर नाराजी व्यक्त करत बाबुल सुप्रियो यांनी भर कार्यक्रमात त्याला चक्क 'पाय तोडण्याची' धमकी दिली. 

'तुम्हाला काही अडचण आहे का?, तुम्हाला काही झालंय का?... मी तुमचे पाय तोडून तुमच्या हातात कुबड्या देऊ शकतो', अशी धमकी रागाच्या भरात बाबुल सुप्रियो यांनी त्या व्यक्तीला दिली. पुढे त्यांनी आपल्या सुरक्षारक्षकालाही अशी सूचना दिली की, 'जर या व्यक्तीनं पुन्हा हालचाल केली तर पाय तोडून त्याच्या हातात कुबड्या द्या'.  

दरम्यान, बेताल आणि वादग्रस्त विधाने करण्याची बाबुल सुप्रियो यांची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही अनेकदा आक्षेपार्ह विधाने केल्यानं ते चर्चेत राहिले आहेत.

(शाळांनी सरकारकडे भीक मागू नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं - प्रकाश जावडेकर)

दरम्यान, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही 14 सप्टेंबरला वादग्रस्त विधान केले होते.  शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, असे वादग्रस्त विधान  प्रकाश जावडेकर यांनी पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात केले होते. यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकादेखील झाली होती.

टॅग्स :BJPभाजपाBabul Supriyoबाबुल सुप्रियो