शाळांनी सरकारकडे भीक मागू नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं - प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 09:14 AM2018-09-15T09:14:37+5:302018-09-15T09:24:24+5:30

शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.

Don’t beg for funds, ask alumni to contribute: Prakash Javadekar to schools | शाळांनी सरकारकडे भीक मागू नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं - प्रकाश जावडेकर

शाळांनी सरकारकडे भीक मागू नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं - प्रकाश जावडेकर

Next

पुणे - शाळांनी सरकारकडे भिकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे. शुक्रवारी (14 सप्टेंबर) पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काही शाळा सरकारकडे आर्थिक मदत मागण्यासाठी भिकेचा कटोरा घेऊन येतात. मात्र ते  माजी विद्यार्थ्यांकडे सहज आर्थिक मदत मागू शकतात. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे असे जनप्रबोधिनी शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाश जावडेकर म्हणाले. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

जनप्रबोधिनी शाळेच्या विकासात माजी विद्यार्थ्यांच्या असलेल्या सहभागाचं जावडेकरांनी कौतुक केलं. “अनेक विद्यार्थी त्यांच्या शाळांना सढळ हस्ते मदत करतात. जनप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी अजून शाळेच्या संपर्कात आहेत. शाळेची चांगली निगा राखावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत,” असंही जावडेकर म्हणाले.

कार्यक्रमादरम्यान जावडेकरांनी त्यांच्या बालपणाची एक आठवण सांगितली. ई-लर्निंग किंवा डिजिटल सुविधा नसतानाही शाळांमधून विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्ये मिळत होती. परंतु आज सातवीतल्या मुलाला चौथीतली गणितं सोडवता येत नाहीत असा दाखला त्यांनी दिला. आम्ही लाखो मुलांची पाहणी करत असून प्रत्येक खासदाराला त्यांच्या मतदारसंघातील मुलांची काय स्थिती आहे ते कळवत आहोत असे जावडेकर म्हणाले. परंतु केवळ सरकारकडे या कामासाठी न बघता सगळ्या समाजानं एकत्र यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना शाळांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागतं याचा आढावा घेण्यास सांगण्यात आला आहे. तसेच समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आल्याचंही जावडेकरांनी सांगितलं. 
 

Web Title: Don’t beg for funds, ask alumni to contribute: Prakash Javadekar to schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.