शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रचाराची सप्तपदी पूर्ण! ७६ दिवस सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप थांबले, उद्या मतदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 05:49 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रदीर्घ अशा कार्यक्रमातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी उद्या ५७ मतदारसंघांत मतदान होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: १८ व्या लोकसभेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सात टप्प्यांत झालेल्या निवडणुकीसाठी ७६ दिवसांपासून देशभरात विविध सभा, रोड शोच्या माध्यमातून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या प्रचारतोफा अखेर गुरुवारी सायंकाळी शांत झाल्या.

शनिवारी, १ जून रोजी देशातील ८ राज्यांतील ५७ जागांसाठी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सभा घेत प्रचाराचा धुरळा उडविला. सातव्या टप्प्यात पंजाबच्या सर्व १३ जागांसह हिमाचल प्रदेश ४, उत्तर प्रदेश १३, बंगाल ९, बिहार ८, ओडिशा ६, झारखंड ३ व चंडीगडच्या एका जागेचा समावेश आहे. 

प्रचार संपताच माेदी ध्यानासाठी कन्याकुमारीत

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपताच गुरुवारी सायंकाळी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत दाखल झाले. विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये ते ४५ तास ध्यानधारणा ते करणार आहे. 
  • कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम भगवती अम्मन मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर बोटीने रॉक मेमोरियलमध्ये येत ध्यान सुरू केले. १ जूनपर्यंत ते ध्यानस्थ राहणार आहेत.

शेवटचा दिवसही गाजला आरोप-प्रत्यारोपांनी!

संविधान वाचविण्याची भाषा करणाऱ्या कॉंग्रेसने मात्र आणीबाणीवेळी लोकशाहीची हत्या केली होती. अग्निवीर योजनेला विरोध करणारे लष्कराला राजकीय हत्यार करू पाहत आहेत.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान

गेल्या १५ दिवसांत माेदींनी सभेत २३२ वेळा काँग्रेसचे नाव घेतले, ७५८ वेळा स्वत:चे, ‘इंडिया’ आघाडीचे आणि विरोधकांचे ५७३ वेळा नाव घेतले, मात्र बेरोजगारीबद्दल शब्दही काढला नाही.- मल्लिकार्जुन खरगे, अध्यक्ष, काँग्रेस

नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत द्वेषपूर्ण विधाने केली. त्यामुळे त्यांनी निवडणूक प्रचारासह पंतप्रधानपदाची प्रतिष्ठाही धुळीस मिळविली.  संविधान वाचविण्याचे काम कॉंग्रेसच करू शकते.- डॉ. मनमोहन सिंह, माजी पंतप्रधान

कोणाच्या किती प्रचारसभा व रोड शो?

  • नरेंद्र मोदी - २०६ 
  • राहुल गांधी - ७६ 
  • प्रियांका गांधी - ३८  
  • अखिलेश यादव - ५४ 
  • मल्लिकार्जुन खरगे - ३१ 
  • मायावती - २१ 
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेManmohan Singhमनमोहन सिंग