VIDEO: लग्न मंडपाकडे नाचत निघाली वधू; वऱ्हाडाला वाहनाची धडक; नातेवाईक हवेत उडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 08:56 AM2021-02-18T08:56:05+5:302021-02-18T08:56:27+5:30

भीषण अपघात कॅमेऱ्यात कैद; दुर्घटनेत एकाचा मृत्यू, १२ जण जखमी

On Camera Speeding Car Hits Brides Wedding Party In UPs Muzaffarnagar | VIDEO: लग्न मंडपाकडे नाचत निघाली वधू; वऱ्हाडाला वाहनाची धडक; नातेवाईक हवेत उडाला

VIDEO: लग्न मंडपाकडे नाचत निघाली वधू; वऱ्हाडाला वाहनाची धडक; नातेवाईक हवेत उडाला

Next

मुझफ्फरनगर: लग्न मंडपाकडे निघालेल्या वऱ्हाडी मंडळीच्या वाहनाला भरधाव वेगानं आलेल्या वाहनानं धडक दिल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या मुझफ्फरनगरमध्ये घडली. मंगळवारी रात्री हा भीषण अपघात घडला. त्यामुळे आनंदात असलेल्या कुटुंब आणि नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १२ जण जखमी झाले. यातील चौघांची प्रकृती गंभीर आहे. 

मुझफ्फरनगरमध्ये झालेल्या अपघाताचा व्हिडीओ समोर आला आहे. अवघ्या ३० सेकंदांच्या व्हिडीओमध्ये वधू अतिशय आनंदात दिसत आहे. ती एका पांढऱ्या रंगाच्या कारच्या सनरुफमधून बाहेर आली आहे. आसपास असलेले नातेवाईक गाण्यांवर नाचत असल्यानं वधूनंदेखील ठेका धरला आहे. तिनं काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. व्हिडीओमध्ये गाण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत आहे. वऱ्हाडी मंडळी आनंदात विवाह स्थळाकडे जाताना दिसत आहेत.



व्हिडीओच्या शेवटच्या काही सेकंदात वधूच्या डाव्या बाजूला मोठा आवाज ऐकू येतो. एक वाहन अतिशय वेगात तिच्या शेजारी असलेल्या व्यक्तीला धडक देतं. वाहनाचा वेग अतिशय जास्त असल्यानं ते वाहन नेमकं कोणतं होतं, तेदेखील व्हिडीओतून समजत नाही. पण त्या वाहनानं दिलेल्या जोरदार धडकेनं वधू शेजारील काही व्यक्ती अक्षरश: हवेत उडालेल्या दिसतात. सुदैवानं भरधाव वाहनानं कारला धडक दिली नाही. त्यामुळे वधूला कोणतीही इजा झाली नाही.

Read in English

Web Title: On Camera Speeding Car Hits Brides Wedding Party In UPs Muzaffarnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.