तिरुअनंतपुरम : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतं आहे. यामध्ये एक नाग चक्क कोंबडीची 7 अंडी ओकताना दिसत आहे. केरळातील सर्प मित्राने हा व्हिडीओ आपल्या फेसबुक पेजला अपलोड केला आहे. त्या सर्प मित्राचे नाव व्हि. पी. सुजीत असे आहे. एका शेतातील कोंबड्यांच्या खुराड्यात नाग शिरतो त्यानंतर तेथील एका कोंबडीला मारुन टाकलेलं दिसतेय. त्यानंतर तो तिची सर्व अंडी फस्त करतो. यानंतर तो नाग खुराड्यात निपचिप्त पडला होता. सर्प मित्र त्या नागाला बाहेर खुराड्यातून बाहेर काढतो. सुजितने नागाने फस्त केलेली अंडी बाहेर काढली, आणि नंतर नागाला जंगलात सोडून देतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
VIDEO : अन् नागाने ओकली कोंबडीची 7 अंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 09:28 IST