शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पोलीस ठाण्यात घुसून जमावाने पोलिसांनाच चोपले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 3:28 PM

चौकशीसाठी बोलावलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर हा संतप्त जमाव ठाण्यावर चालून आला.

नेल्लोर- आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यामध्ये संतप्त जमावाने थेट पोलीस ठाण्यात घुसून पोलिसांनाच मारहाण केली आहे. या सर्व प्रकाराचे कॅमेरामध्ये चित्रिकरण झाले असून आता जमावातील व्यक्ती शोधून त्यांच्यावर कारवाई होणार आहे.संतप्त जमाव पोलीस ठाण्यावर चालून येत असल्याचे दिसताच पोलिसांनी ठाण्याची दारं बंद केली. तरिही त्या दारावर धडका देत जमावाने दार मोडून काढले आणि आत प्रवेश केला. हा प्रकार नेल्लोरमधील रापुरु पोलीस ठाण्यात झाला.

चौकशीसाठी बोलावलेल्या एका व्यक्तीला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर हा संतप्त जमाव ठाण्यावर चालून आला. या गोंधळाचे व हल्ल्याच चित्रिकरण करणाऱ्या एका पोलिसाने त्यामध्ये पडण्याचा प्रयत्न केल्यावर त्यालाही मारहाण करण्यात आली. जमावाच्या हल्ल्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण बाबू आणि तीन हवालदार जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे पोलीस उपाधीक्षक राम बाबू यांनी सांगितले. एका दारु प्यायलेल्या माणसाला आम्ही पकडले होते त्याच्यावर योग्य रितीने कारवाई करण्यासाठी आम्ही रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. यावर स्थानिकांनी आक्षेप घेतला व मारामारी झाली. त्यांनी पोलीस ठाण्यावर हल्ला केला आणि उपनिरीक्षकाला बाहेर फरपटत आणले. त्याच्या डोक्याला दुखापत झाली असून तीन हवालदारांना किरकोळ जखमा झाल्या आहेत असे पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले. पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या लोकांवर कारवाई करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे