सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणाल तर...; उच्च न्यायालायची महत्त्वपूर्ण टिप्पणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 11:13 AM2024-03-03T11:13:27+5:302024-03-03T11:17:14+5:30

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जय सेनगुप्ता म्हणाले की, आरोपी दारूच्या नशेत असला किंवा अन्य कोणत्याही नशेत असला तरीही त्याने एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळाचा दोषी मानला जाईल. 

calling unknown women darling is a sexual harassment says calcutta high court | सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणाल तर...; उच्च न्यायालायची महत्त्वपूर्ण टिप्पणी

सावधान! अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणाल तर...; उच्च न्यायालायची महत्त्वपूर्ण टिप्पणी

कोलकाता उच्च न्यायलयाने काल महिलांबाबत एक महत्वाचा निर्णय दिला. जर एखाद्या व्यक्तीने एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले तर तो लैंगिक छळाचा दोषी मानला जाईल आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 354A अंतर्गत त्याला तुरुंगात जावे लागेल आणि दंडही भरावा लागेल, असे एका सुनावणीत कोलकाता उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जय सेनगुप्ता म्हणाले की, आरोपी दारूच्या नशेत असला किंवा अन्य कोणत्याही नशेत असला तरीही त्याने एखाद्या अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटले, तर तो लैंगिक छळाचा दोषी मानला जाईल. 

"भाजपाने पहिल्या यादीतच पराभव स्वीकारला, बंडखोरीच्या भीतीने..."; अखिलेश यादवांचा निशाणा

न्यायमूर्ती सेनगुप्ता यांनी अपीलकर्ता आरोपी जनक रामची शिक्षा कायम ठेवली, त्याने मद्यधुंद अवस्थेत पकडल्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्याला म्हटले होते की, 'डार्लिंग' तू चालान काढायला आली आहेस का?"

खंडपीठाच्या अहवालानुसार, न्यायमूर्ती सेनगुप्ता यांनी कलम 354A संदर्भ देत म्हटले की, महिला पोलिस अधिकाऱ्यावर आरोपीची टिप्पणी लैंगिक टिप्पणीच्या कक्षेत येते आणि ही तरतूद आरोपीला शिक्षा करेल. ते म्हणाले, "रस्त्यावर असलेल्या एका अनोळखी महिलेला कोणताही पुरुष 'डार्लिंग' असे संबोधू शकत नाही, जरी ती पोलिस हवालदार असली तरी.

न्यायमूर्ती सेनगुप्ता म्हणाले की, कोणतीही व्यक्ती, दारूच्या नशेत असो किंवा नसो, कोणत्याही अज्ञात महिलेला 'डार्लिंग' या शब्दाने संबोधू शकत नाही आणि जर त्याने तसे केले असेल तर ते स्पष्टपणे अपमानास्पद आहे आणि त्याचे शब्द मुळात लैंगिक टिप्पणी आहेत. आरोपीने न्यायालयात दावा केला की टिप्पणीच्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता याचा कोणताही पुरावा नाही.

यावर हायकोर्टाने म्हटले की, 'आरोपींनी शांत स्थितीत असताना महिला अधिकाऱ्यावर हे भाष्य केले असेल, तर गुन्हा अधिक गंभीर होतो.' न्यायमूर्ती सेनगुप्ता म्हणाले की, आमचा समाज रस्त्यावर चालत असताना कोणत्याही अनोळखी महिलेला 'डार्लिंग' म्हणण्याची परवानगी देत ​​नाही. लैंगिक छळाच्या प्रकरणात दोषीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्हीही होऊ शकतात.

Web Title: calling unknown women darling is a sexual harassment says calcutta high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.