एखाद्याला "मियाँ-तियां" आणि "पाकिस्तानी" म्हणणे गुन्हा नाही, पण चुकीचे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:55 IST2025-03-04T12:55:32+5:302025-03-04T12:55:56+5:30

सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. यामध्ये आरोपीला दोषमुक्त करण्यात आले आहे.

Calling someone "Mian-Tian" and "Pakistani" is not a crime, but it is wrong; Important verdict of the Supreme Court | एखाद्याला "मियाँ-तियां" आणि "पाकिस्तानी" म्हणणे गुन्हा नाही, पण चुकीचे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

एखाद्याला "मियाँ-तियां" आणि "पाकिस्तानी" म्हणणे गुन्हा नाही, पण चुकीचे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वपूर्ण निकाल दिला आहे. थट्टा मस्करीत किंवा चिडविण्याच्या भानगडीत अनेकदा एखाद्याला पाकिस्तानी किंवा मिया तिया असे म्हटले जाते. असे म्हणणे हा गुन्हा नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हे चुकीचे आहे परंतू, आयपीसी २९८ नुसार कोणाच्या धार्मिक भावनांना ठेस पोहोचविण्याच्या कक्षेतील गुन्हा नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. यामध्ये आरोपीला दोषमुक्त करण्यात आले आहे. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम २९८ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे) अंतर्गत आरोपीला दोषमुक्त केले.

आरोपीने अपिलकर्त्याला "मियाँ-तियां" आणि "पाकिस्तानी" असे संबोधले होते. यामुळे त्याच्यावर त्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर सुनावणी पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यालयाने न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने ११ फेब्रुवारी रोजी हा निकाल दिला होता. 

दोघेही सरकारी कर्मचारी होते. कामावर असताना एकाने दुसऱ्याला पाकिस्तानी म्हटले होते. यावरून वाद झाल्याने ज्याला पाकिस्तानी म्हटले होते त्याने पोलिसांत धाव घेतली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. एका उर्दू अनुवादक आणि एका कार्यवाहक लिपिकाने ही तक्रार दाखल केली होती. जेव्हा तो माहिती अधिकार (आरटीआय) अर्जाची माहिती देण्यासाठी आरोपीकडे गेला तेव्हा त्याने त्याच्या धर्माचा उल्लेख करून हिणविले होते. तसेच कर्तव्य पार पाडण्यापासून रोखण्यासाठी गुन्हेगारी बळाचा वापर केला होता. झारखंड उच्च न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले होते. याविरोधात आरोपीने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. 

आरोपीने शांतता भंग करण्यास प्रवृत्त करणारे कोणतेही कृत्य केले नव्हते. कलम ३५३ आयपीसी (सरकारी कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी हल्ला किंवा गुन्हेगारी शक्ती) लागू करण्यासाठी आरोपीने कोणत्याही बळाचा वापर केलेला नव्हता, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 
 

Web Title: Calling someone "Mian-Tian" and "Pakistani" is not a crime, but it is wrong; Important verdict of the Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.