शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह, कंगना रणौतच्या विधानावर संतापले गांधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 14:56 IST

कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपस्याचा अपमान, कधी त्यांच्या हत्याऱ्याचा सन्मान, आणि आता शहीद मंगल पांडेंपासू ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार.

ठळक मुद्देइतिहास हा अतिशय महत्त्वाचा विषय असून सर्वच तरुण आणि विद्यार्थ्यांकडून त्याचा सखोल अभ्यास केला जातो. मात्र, इतिहासाच्या ज्ञानाचा अभाव असल्यानंतर अशा पद्धतीचं चुकीचं विधान केलं जातं

नवी दिल्ली -  बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने अतिशय आनंदी आहे. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावले आहेत. तसेच तिने चाहत्यांचे आभारही मानले आहेत. आता एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधील वक्तव्यामुळे कंगना ट्रोल होत आहे. काँग्रेस नेत्यांनीही कंगनाला खडेबोल सुनावले आहेत. तर, वरुण गांधी यांनीही कंगनाच्या विधानावरुन संताप व्यक्त केला आहे. 

देशात जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा मला 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. मी राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर चर्चा करते, सैन्य दलाबद्दल बोलते किंवा आपल्या संस्कृतीला प्रमोट करण्याचं काम करते, तेव्हा मला भाजपसोबत जोडलं जातं. पण, हे मुद्दे भाजपचे कसे काय होऊ शकतात, ते तर देशाचे मुद्दे आहेत, असे कंगनाने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. कंगनाने या मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्येच मिळालं, असं कंगनाने म्हटलं आहे. त्यानंतर, वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केलाय. 

कधी महात्मा गांधीजींचा त्याग आणि तपस्याचा अपमान, कधी त्यांच्या हत्याऱ्याचा सन्मान, आणि आता शहीद मंगल पांडेंपासू ते राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा तिरस्कार. या विचारधारेला मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह? अशा शब्दात वरुण गांधी यांनी कंगनाविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. वर्षा गायकवाड यांनीही लगावला टोला

इतिहास हा अतिशय महत्त्वाचा विषय असून सर्वच तरुण आणि विद्यार्थ्यांकडून त्याचा सखोल अभ्यास केला जातो. मात्र, इतिहासाच्या ज्ञानाचा अभाव असल्यानंतर अशा पद्धतीचं चुकीचं विधान केलं जातं, अशा शब्दात शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कंगना रणौतला टोला लगावला आहे.    कंगनाला केलं जातंय ट्रोलकंगनाच्या या स्वातंत्र्यासंदर्भातील विधानावरुन तिला चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर कंगनाचा व्हिडिओ व्हायरल होत असून तिला नेटीझन्सकडून प्रश्न विचारण्यात येत आहेत. ट्विटर युजर रोफी गांधी या हँडलवरुन कंगनाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. लाकडाच्या घोड्यावर प्लॅस्टीकची तलवार घेऊन बसणारी वीरांगना, सरकारची बोली बोलणारी स्वातंत्र्य संग्रामातील वीरांचा अपमान करत आहे. हजारो भारतीयांच्या बलिदांनाला भीक म्हणते आहे, असेही या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलं आहे.  

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतVarun Gandhiवरूण गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस