कॅफेवर गोळीबार (डेन्मार्क)

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:53+5:302015-02-14T23:51:53+5:30

कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार, १४ फेब्रुवारी २०१५कोपेनहेगन कॅफेवर गोळीबारकोपेनेहेगन : उत्तर कोपेनहेगनमधील कॅफेवर एका हल्लेखोराने बेछुट गोळीबार करीत अभिव्यक्ती ...

Café firing (Denmark) | कॅफेवर गोळीबार (डेन्मार्क)

कॅफेवर गोळीबार (डेन्मार्क)

>कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार, १४ फेब्रुवारी २०१५

कोपेनहेगन कॅफेवर गोळीबार
कोपेनेहेगन : उत्तर कोपेनहेगनमधील कॅफेवर एका हल्लेखोराने बेछुट गोळीबार करीत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. जाझसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रुडट्टोएनडेन कॅफेत स्वीडीश कलाकार लार्स व्हिल्क्सने परिसंवादाचे आयोजन केले होते.
टीव्ही-२ चॅनलच्या वृत्तानुसार हल्लेखोराने या कॅफेवर ३० फैरी झाडल्याने खिडकीची चाळणी झाली. दोन व्यक्तींना स्ट्रेचरवरून नेण्यात आले. यात एका पोलिस अधिकार्‍याचा समावेश आहे. कला, ईशनिंदा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असा या परिसंवादाचा विषय होता.
डेन्मार्कमधील फ्रेंच राजदूत फ्रॅन्कोईस झिमेरी हेही यावेळी या कॅफेतील सभागृहात उपस्थित होते. हेली मेरेट ब्रिक्स यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, कलाकार लार्स व्हिलक्स हेही यावेळी उपस्थित होते. सुदैवाने ते जखमी झाले नाहीत. एक बुरखाधारी व्यक्ती पळत जातांनी मी पाहिले. या हल्ल्यात दोन पोलिस अधिकारी जखमी झाले आहेत. लार्स व्हिल्क्स हेच हल्लखोरांचे लक्ष्य होते, असेही त्यांनी सांगितले. स्वीडीश कलाकार लार्स व्हिल्क्स यांना अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या असून त्यांच्यावर हल्ल्याचे प्रयत्न झाले. पेनेस्लिव्हियाच्या एक महिलने लार्स व्हिलक्स यांना ठार मारण्याचा कट केला होता. तिला गेल्या वर्षी १० वर्षाचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.


Web Title: Café firing (Denmark)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.