Cabinet reshuffle LIVE Updates : महाराष्ट्रातील चारही शिलेदारांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 19:33 IST2021-07-07T12:54:18+5:302021-07-07T19:33:06+5:30

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा ...

Cabinet reshuffle LIVE Updates : modi cabinet expansion minister name central government live updates | Cabinet reshuffle LIVE Updates : महाराष्ट्रातील चारही शिलेदारांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

Cabinet reshuffle LIVE Updates : महाराष्ट्रातील चारही शिलेदारांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात सहभागी होणाऱ्यांमध्ये ज्या नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. त्यातील अनेक नेते दिल्लीत पोहचले आहेत. यात ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, पशुपति पारस, नारायण राणे आणि वरूण गांधींचा समावेश आहे. विद्यमान मंत्रिमंडळातून पाच ते सहा मंत्र्यांना वगळून त्यांना पक्षाच्या कामात घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच, उत्तर प्रदेशसह काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि २०२४ ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला आहे.

LIVE

Get Latest Updates

07:39 PM

नव्या सर्व ४३ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची सांगता

मंत्रिमंडळ विस्तारातील विश्वेश्वर तुडू, शंतनू ठाकूर, डॉ. मुंजापारा महेंद्रभाई, जॉन बारला, डॉ. एल. मुरुगन आणि निसिथ प्रामाणिक यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील चारही शिलेदारांसह संपूर्ण ४३ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची राष्ट्रपती भवनात सांगता झाली. 

07:19 PM

डॉ. भारती पवार यांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ

डॉ. भागवत कराड यांच्यानंतर डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याआधी पंकज चौधरी, अनुप्रिया सिंग पटेल, सत्यपाल सिंग बघेल, राजीव चंद्रशेखर, शोभा करांडलाजे, भानूप्रताप सिंह वर्मा, दर्शना विक्रम जरदोश, मीनाक्षी लेखी, अन्नपूर्णा देवी, ए. नारायणस्वामी, कौशल किशोर, अजय भट्ट, बी. एल. वर्मा, अजय कुमार, चौहान देवुसिंह, भगवंत खुबा, प्रतिमा भौमिक, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार सिंह यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. 

07:13 PM

डॉ. भागवत कराड यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

कपिल पाटील यांच्यानंतर डॉ. भागवत कराड यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

07:06 PM

कपिल पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

भिवंडी येथून खासदार असलेल्या कपिल पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

06:38 PM

अनुराग सिंह ठाकूर यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

नव्या मंत्र्यांचा शपथविधी सुरू असून, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर रामचंद्र प्रसाद सिंह, अश्विनी वैष्णव, पशुपती कुमार पारस, किरण रिजीजू, राजकुमार सिंह, हरदीप सिंह पुरी, मनसुख मांडवीय, भुपेंद्र यादव, पुरुषोत्तम रुपाला, जी. किशन रेड्डी आणि अनुराग सिंह ठाकूर यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.

 

06:22 PM

ज्योतिरादित्य शिंदे यांच्या समर्थकांचा जल्लोष

मोदी सरकारमधील नवीन मंत्रिमंडळात वर्णी लागलेल्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर त्यांच्या समर्थकांनी भोपाळमधील भाजप कार्यालयाबाहेर जोरदार जल्लोष साजरा केला. 

06:16 PM

नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास सुरुवात

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारातील नव्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास सुरुवात झाली असून, नारायण राणे यांच्यानंतर सर्बानंद सोनोवाल, डॉ. विरेंद्र कुमार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

06:01 PM

काही क्षणातच शपथविधी सोहळ्यास सुरुवात

नव्या ४३ मंत्र्यांच्या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मंत्री राष्ट्रपती भवनात दाखल झाले असून, काही क्षणातच सोहळ्याला सुरुवात होणार आहे.

06:01 PM

नारायण राणे यांनी घेतली केंद्रीय मंत्रिपदाची शपथ

नव्या ४३ मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यास राष्ट्रपती भवनात सुरुवात झाली असून, प्रथम खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.

05:48 PM

राष्ट्रपतींकडून १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मंजूर

राष्ट्रपती भवनकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतींनी रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर, डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक यांच्यासह १२ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मंजूर केले आहेत.

05:29 PM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष रवाना

केंद्रातील नव्या ४३ मंत्र्यांच्या शपथविधीसाठी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा निवासस्थानातून रवाना. 

 

05:29 PM

रविशंकर प्रसाद आणि प्रकाश जावडेकर यांचाही राजीनामा

04:41 PM

४३ मंत्र्यांच्या नावाची यादी...

आज संध्याकाळी ६ वाजता राष्ट्रपती भवनात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात ४३ मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.

१. नारायण राणे

२. सर्बांनंद सोनोवोल

३. विरेंद्र कुमार

४. ज्योतिरादित्य शिंदे

५. रामचंद्र प्रसाद सिंग

६. अश्विनी वैष्णव

७. पशुपति कुमार पारस

८. किरण रिजाजू

९. राजकुमार सिंह

१०. हरदीप सिंग पुरी

११. मनसुख मंदाविया

१२. भूपेंद्र यादव

१३. पुरुषोत्तम रुपेला

१४. जी. किसन रेड्डी

१५. अनुराग सिंग ठाकूर

१६. पंकज चौधरी

१७. अनुप्रिया सिंग पटेल

१८. सत्यपाल सिंग बघेल

१९. राजीव चंद्रशेखर

२०. शोभा करांडलाजे

२१. भानूप्रताप सिंह वर्मा

२२. दर्शना विक्रम जरदोश

२३. मीनाक्षी लेखी

२४. अन्नपूर्णा देवी

२५. ए. नारायणस्वामी

२६. कौशल किशोर

२७. अजय भट्ट

२८. बी. एल. वर्मा

२९. अजय कुमार

३०. चौहान देवुसिंह

३१. भगवंत खुबा

३२. कपिल पाटील

३३. प्रतिमा भौमिक

३४. डॉ. सुभाष सरकार

३५. डॉ. भागवत कराड

३६. डॉ. राजकुमार सिंह

३७. डॉ. भारती पवार

३८. विश्वेश्वर तुडू

३९. शंतनू ठाकूर

४०. डॉ. मुंजापारा महेंद्रभाई

४१. जॉन बारला

४२. डॉ. एल. मुरुगन

४३. निसिथ प्रामाणिक

04:26 PM

नारायण राणेंसह राज्यातील चार नेत्यांचा समावेश

४३ मंत्र्यांच्या यादी महाराष्ट्रातील चार नेत्यांची नावे आहेत. यामध्ये नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांची नावे आहेत.
 

04:11 PM

43 नेते घेणार मंत्रिपदाची शपथ

43 नेते आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, पशुपती कुमार पारस, भुपेंद्र यादव, अजय भट्ट, मिनाक्षी लेखी यांचा समावेश आहे.



 

04:07 PM

अनुप्रिया पटेल यांचा समावेश?

उत्तर प्रदेशमधील जवळपास सात नेते केंद्रीय मंत्रिमंडळात येऊ शकतात. यामध्ये कौशल किशोर, एसपी बघेल, पंकज चौधरी, बीएल वर्मा, अजय मिश्रा, भानु प्रताप वर्मा आणि अपना दलाच्या अनुप्रिया पटेल यांचा समावेश आहे.

04:01 PM

आतापर्यंत 11 मंत्र्यांनी दिला राजीनामा

• डॉ हर्षवर्धन (आरोग्यमंत्री)
• रमेश पोखरीयाल निशंक (शिक्षणमंत्री)
• संतोष गंगवार (कामगार मंत्री)
• देबोश्री चौधरी (महिला महिला राज्यमंत्री)
• सदानंद गौडा (रसायन व खते मंत्रालय)
• संजय धोत्रे (केंद्रीय राज्यमंत्री)
• थावरचंद गहलोत
• प्रताप सारंगी (राज्यमंत्री)
• रतनलाल कटारिया (राज्यमंत्री)
• बाबुल सुप्रियो (राज्यमंत्री)
• रावसाहेब दानवे पाटील (राज्यमंत्री)

03:34 PM

मोदींची भाजपा खासदारांसोबत चर्चा

मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजपा खासदारांसोबत चर्चा केली.



 

02:59 PM

हर्षवर्धन...निशंक...गंगवार..., विस्तारापूर्वी मोदी मंत्रिमंडळातून उचलबांगडी!

डॉ. हर्ष वर्धन, बाबुल सुप्रियो, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देवोश्री चौधरी, संतोष गंगवार, संजय धोत्रे, रतनलाल कटारिया आणि प्रताप सारंगी यांची विस्तारापूर्वी मोदी मंत्रिमंडळातून उचलबांगडी करण्यात आली आहे. या सर्वांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. 



 

02:37 PM

जेडीयूच्या चार सदस्यांना स्थान मिळू शकते

सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयूच्या चार सदस्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकेल. त्यापैकी आरसीपी सिंग यांना कॅबिनेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर चंद्रेश्वर प्रसाद, रामनाथ ठाकूर, दिलेश्वर कामित यांना राज्यमंत्री केले जाऊ शकते.

02:11 PM

हरदीपसिंग पुरी यांनाही बढती?

केंद्रीय मंत्रिमंडळात मनसुख मंडविया, हरदीपसिंग पुरी, आरके सिंग यांनाही बढती दिली जाऊ शकते. अनुराग ठाकूर यांना स्वतंत्र पदभार देण्यात देऊ शकतो तर अश्वनी वैष्णव यांना त्यांच्या जागी वित्त राज्यमंत्री केले जाऊ शकते.
 

01:48 PM

४३ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार

मोदी सरकारच्या बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. बुधवारी संध्याकाळी ६ वाजता नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यात ४३ नेते मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.


01:33 PM

सर्बानंद सोनोवाल हे मोदींच्या निवासस्थानी दाखल

आसाममध्ये माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल निवडणुकीनंतर हेमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार झाले. त्यांचाही कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्बानंद सोनोवाल हे मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले आहे.



 

01:26 PM

मंत्रिमंडळ विस्ताराचे अधिकृत निमंत्रण

01:26 PM

रमेश पोखरियाल निशंक यांना मंत्रिमंडळातून वगळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काही मंत्र्यांसमवेत सुरू असलेली बैठक संपली आहे. संध्याकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. संतोष गंगवार, रमेश पोखरियाल निशंक, सदानंद गौडा, देवोश्री चौधरी, थावरचंद गहलोत यांना मंत्रिमंडळातून हटविण्यात आले आले आहे.

01:15 PM

अनुराग ठाकूर यांना मिळू शकते बढती

मंत्रिमंडळाच्या विस्तारात काही मंत्र्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. अनुराग ठाकूर, पुरुषोत्तम रुपाला आणि जी. किशन रेड्डी यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळू शकते.



 

01:13 PM

अमित शहा, जेपी नड्डा यांचीही उपस्थिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि भाजपा नेते बीएल संतोष हे पंतप्रधान निवासस्थानी आहेत.
 

01:10 PM

अनेक नेते मोदींच्या निवासस्थानी दाखल

संध्याकाळी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी अनेक नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. भाजपा नेते ज्योतिरादित्य शिंदे, सर्बानंद सोनोवाल, अजय भट्ट, कपिल पाटील, शांतनु ठाकूर, पशुपती पारस, नारायण राणे, मीनाक्षी लेखी, शोभा करंडलजे, अनुपिया पटेल, हिना गावित, अजय मिश्रा हे मोदींचया निवासस्थानी दाखल झाले आहेत.



 

01:02 PM

युवांचा मंत्रिमंडळात समावेश

आज होणारा विस्तार हा भारताच्या राजकीय इतिहासातील सर्वात तरूण मंत्रिमंडळ असणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांच्या सरासरी वयापेक्षा सर्वात कमी आणि शैक्षणिक पात्रतेनुसार युवांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. यात पीएचडी, एमबीए, पोस्ट ग्रॅज्युएट आणि प्रोफेशनल यांचा समावेश आहे.
 

01:00 PM

ज्योतिरादित्य शिंदेंना मिळणार मंत्रिपद?

दिल्लीला जाण्यापूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिरात पूजा केली. मागील वर्षी काँग्रेस सोडून शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजपा प्रवेशामुळे मध्य प्रदेशात कमलनाथ सरकार कोसळलं आणि भाजपा पुन्हा सत्तेत आली. 
 

12:58 PM

सुशील मोदी, वरुण गांधी यांनाही मंत्रिपद मिळू शकते

सुशील मोदी, वरुण गांधी, भूपेंद्र यादव,  दिलीप घोष या भाजपा नेत्यांना तसेच लल्लन सिंग (जेडीयू), पशुपती पारस (एलजेपी), अनुप्रिया पटेल (अपना दल), चंद्र प्रकाश (एजेएसयू) यांना सामावून घेण्याचा भाजपा पक्षश्रेष्ठीचा प्रयत्न राहणार आहे.  
 

12:57 PM

सर्बानंद सोनोवाल मंत्रिमंडळात?

आसाममध्ये माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल निवडणुकीनंतर हेमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडण्यास तयार झाले. त्यांचाही कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. 
 

12:55 PM

महाराष्ट्राच्या वाट्याला दोन किंवा तीन मंत्रिपदे 

मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्राच्या वाट्याला दोन किंवा तीन मंत्रिपदे मिळण्याची दाट शक्यता आहे. पूनम महाजन किंवा प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर भाजपामध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 

Web Title: Cabinet reshuffle LIVE Updates : modi cabinet expansion minister name central government live updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.