CAA : आंदोलकांकडून योगी सरकार वसूल करणार 21 लाख
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 17:35 IST2020-02-13T17:35:37+5:302020-02-13T17:35:46+5:30
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच आंदोलनकर्त्यांना नुकसान केल्यास रक्कम वसूल करण्याचा इशारा दिला होता.

CAA : आंदोलकांकडून योगी सरकार वसूल करणार 21 लाख
उत्तरप्रदेश : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात आंदोलने केली जात आहे. तर अनेक ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे सुद्धा पाहायला मिळाले. मात्र योगी सरकारने अशा हिंसा करणाऱ्या आंदोलकांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणाऱ्यांकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात येत आहे. तर अशाच 13 लोकांकडून 21 लाख 76 हजार रुपये वसूल केले जाणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याआधीच आंदोलनकर्त्यांना नुकसान केल्यास रक्कम वसूल करण्याचा इशारा दिला होता. तर 19 डिसेंबर रोजी उत्तरप्रदेशमध्ये नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात मोठ्याप्रमाणावर सरकारी संपत्तीचं नुकसान झाले होते. तर 2 लोकांचा मृत्यू सुद्धा झाला होता. त्यांनतर पोलिसांनी नुकसान करणाऱ्या लोकांची ओळख पटवली होती.
तर अशा 13 आंदोलकांना नुकसानभरपाई भरण्याची नोटीस सरकराने पाठवली असून, 21 लाख 76 हजार भरण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहे. तर यापुढे अशा आंदोलनात सहभाग न घेण्याचे सुद्धा आदेश बजावण्यात आले आहे. तसेच ते पुन्हा ते आंदोलनाता सहभागी झाल्यास 50 लाखाचे दंड त्यांना भरावे लागणार असल्याचे नोटीसमध्ये उल्लेख केला गेला आहे. तर 16 मार्च पूर्वी ही नुकसानभरपाई भरण्याची मुदत देण्यात आली आहे.