‘दिल्ली दंगलीतील आरोपी शर्जील इमामचा PFIशी संबंध’, चार्जशीटमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 07:41 PM2022-08-24T19:41:15+5:302022-08-24T19:43:16+5:30

शर्जील इमामने सीएएविरोधी आंदोलन आणि दिल्ली दंगलीदरम्यान जमात-ए-इस्लामी आणि पीएफआयशी संपर्क साधला होता.

CAA riots: 'Delhi riots accused Sharjeel Imam's connection with PFI', big reveal from charge sheet | ‘दिल्ली दंगलीतील आरोपी शर्जील इमामचा PFIशी संबंध’, चार्जशीटमधून मोठा खुलासा

‘दिल्ली दंगलीतील आरोपी शर्जील इमामचा PFIशी संबंध’, चार्जशीटमधून मोठा खुलासा

Next

नवी दिल्ली: 2020 साली राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शर्जील इमामबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी असलेला शर्जील इमाम याचे पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंध होते. दिल्ली पोलिसांनी चार्जशीटमध्ये हा खुलासा केला आहे. 

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्जील इमामने सीएए आणि दिल्ली दंगलीच्या निषेधार्थ जमात-ए-इस्लामी आणि पीएफआयशी संपर्क साधला होता. इतकंच नाही तर शर्जीलने त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मुख्य सदस्यांशी भेटून बाकीच्या विद्यार्थ्यांना भडकावले होते. त्याचा परिणाम दिल्ली दंगलीच्या रूपात समोर आला. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हा खुलासा शर्जील इमामच्या मोबाईल फोनवरून झाला आहे. 

सीएए आंदोलनादरम्यान दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर शर्जील इमामला अटक करताना पोलिसांनी त्याचा मोबाईलही ताब्यात घेतला होता. यानंतर दिल्ली पोलिसांना मोबाईल डेटा शोधत असताना व्हॉट्सअॅपमध्ये 'कोअर मेंबर्स ऑफ मेसेज' नावाचा ग्रुप सापडला. या ग्रुपमध्ये शर्जील इमामने जेएनयूमध्ये झालेल्या मीटिंगचा तपशील शेअर केला होता. दिल्ली पोलिसांनी सांगितले की शर्जील इमामने 15 डिसेंबर 2019 रोजी जेएनयू कॅम्पसमध्ये असलेल्या ढाब्यावर व्हॉट्सअॅप ग्रुपच्या मुख्य सदस्यांसोबत बैठक घेतली होती. या बैठकीपूर्वी शर्जीलने त्याच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील काही सदस्यांसह जामिया विद्यापीठालाही भेट दिली होती. 

यूएपीए अंतर्गत एफआयआर नोंदवला
जेएनयूचा माजी विद्यार्थी शरजील इमाम याच्यावर आरोप आहे की, त्याने आपल्या भाषणात आसामला देशाच्या इतर भागाशी जोडणारा अरुंद भाग म्हणजेच चिकन नेक एरिया वेगळा करण्याबाबत वक्तव्य केले होते. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने आरोपी शरजीलविरुद्ध बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत (UAPA) गुन्हा दाखल केला होता.

Web Title: CAA riots: 'Delhi riots accused Sharjeel Imam's connection with PFI', big reveal from charge sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.