शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

CAA: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा 'तो' व्हिडीओ भाजपाकडून व्हायरल, काँग्रेसची गोची 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 17:24 IST

बांग्लादेशात धार्मिकतेमुळे हिंसा झालेल्या शरणार्थींबाबत सरकारला सहानभूतीपूर्वक विचार करावा लागेल

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशातील विविध भागात आंदोलन पुकारण्यात आलं आहे. डाव्या पक्षांनी भारत बंदचं आवाहन केलं त्याला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. या दरम्यान भाजपाकडूनकाँग्रेसला घेरण्यासाठी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचा जुना व्हिडीओ समोर आणला आहे. २००३ मध्ये राज्यसभेत मनमोहन सिंग बोलतानाचा हा व्हिडीओ आहे. 

या व्हिडीओमध्ये डॉ. मनमोहन सिंग म्हणतात की, बांग्लादेशात धार्मिकतेमुळे हिंसा झालेल्या शरणार्थींबाबत सरकारला सहानभूतीपूर्वक विचार करावा लागेल. २००३ मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार होतं. त्यावेळी मनमोहन सिंग राज्यसभेचे सदस्य होते. यावेळी सभागृहात उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्यावर टीका करताना मनमोहन सिंग यांनी हे वक्तव्य केलं होतं. 

इतर देशातून आलेले शरणार्थी यांचे दु:ख केंद्र सरकारने समजून घ्यावे, विभाजनानंतर बांग्लादेशात धार्मिक हिंसाचार उफाळून आला. त्यात अनेकांवर अत्याचार झाले. जर हे लोक शरणार्थी म्हणून भारतात येत असतील तर त्यांना सांभाळणे आपलं दायित्व आहे. या लोकांना शरण देणे व्यवहार्य राहील. त्यामुळे सरकारने नागरिकत्व सुधारणा विधेयकाकडे लक्ष द्यावं अशी मागणी डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेत केली होती. सध्या काँग्रेस धार्मिक मुद्द्यावरुन नागरिकत्व देण्याचा विरोध करत केंद्र सरकारवर टीका करत आहे. अशावेळी भाजपाकडून काँग्रेसचे पूर्वीचे व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहेत. भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुन डॉ. मनमोहन सिंग यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

डाव्यांच्या या बंदला विरोधकांनी समर्थन दिलं आहे. उत्तर प्रदेश, कर्नाटकतील अनेक भागात मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्यात येत आहे. तर दिल्लीतील 14 मेट्रो स्टेशन बंद करण्यात आली आहेत. लाल किला, जामा मशीद, चांदणी चौक आणि विश्वविद्यालयातील प्रवेशद्वार बंद करण्यात आला आहे, असं डीएमआरसीनं ट्विट करत सांगितलं आहे. तसेच जामिया मिलिया इस्लामिया, जसोला विहार, शाहीन बाग आणि मुनिरका स्टेशनांवरही ट्रेन थांबवण्यास मज्जाव करण्यात आला आहे. नागरिकत्व कायद्यासंदर्भात पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी हिंसक प्रदर्शन झालेलं नाही. तसेच डावे रामलीलापासून लेडी ब्रेबॉर्न कॉलेजपर्यंत मार्च काढणार आहे. तसेच बुद्धिजिवी वर्ग रामलीला मैदान ते हॉग मार्केटपर्यंत मार्च काढणार आहेत. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगcongressकाँग्रेसBJPभाजपा