शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

CAA: हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेची खबरदारी घ्या; केंद्रीय गृह मंत्रालयाची सर्व राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 18:53 IST

विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

ठळक मुद्देकेंंद्रीय गृह मंत्रालयाकडून राज्य आणि केंद्रशासित राज्यांना सूचना जारी सोशल मीडियातील चुकीच्या प्रचाराकडे लक्ष ठेवाहिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घ्यावी

नवी दिल्ली - सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आसामापासून राजधानी दिल्लीपर्यंत अनेक भागात हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना जारी केली आहे. हिंसक आंदोलनाला रोखलं कसं जाईल यावर खबरदारी आणि राज्यातील प्रत्येक नागरिकांची सुरक्षा अबाधित राहील याची दक्षता घेण्याचे आदेश दिलेत. 

अमित शहांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याचे आदेश दिले आहे. सोशल मीडियावर वरुन होणाऱ्या फेक न्यूज आणि अफवांवर लक्ष ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात सोशल मीडियात अनेक खोटी माहिती पसरविण्यासाठी केंद्र सरकारने जबाबदार धरलं आहे.

मात्र यापूर्वी भाजपाने पत्रकार परिषद घेत जामियासह देशभरात हिंसक आंदोलन भडकण्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप केला आहे. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध पक्ष राजकारण करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी राहुल गांधी, प्रकाश करात, डी. राजा असे लोक त्याठिकाणी गेले होते. पुन्हा एकदा अशाप्रकारचे प्रयत्न होताना दिसत आहे. शनिवारी राहुल गांधी यांची रॅली झाली. या रॅलीच्या माध्यमातून रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न झाला अन् दुसऱ्याच दिवशी हिंसाचार वाढला. त्यामुळे या संपूर्ण हिंसक आंदोलनाच्या मागे काँग्रेसचा हात आहे असा आरोप भाजपाने केला आहे. त्याचसोबत राजकीय पक्षांनी आपापल्या ओवैसींना मुस्लीम मतांसाठी उतरविले आहे. ओवैसी देशाचे नवे जिन्ना आहे असा आरोपही भाजपाने केला. दरम्यान, जामिया विश्वविद्यापीठातील युवकांना टॉयलेटमध्ये घुसून पोलिसांनी मारहाण केली. मुलींनाही मारहाण करण्यात आली.

आमच्या काळातही विद्यार्थ्यांची आंदोलन होत होती. मात्र कॉलेज प्राध्यापकांच्या परवानगीशिवाय पोलीस विद्यापीठात प्रवेश करु शकत नव्हते. जर कुलगुरु आणि कॉलेज प्राचार्यांनी परवानगी दिली नाही तर दिल्ली पोलीस विद्यापीठात घुसले कसे? याचे उत्तर केंद्र सरकारने द्यावे अशी मागणी विरोधकांनी केली आहे.  

त्याचसोबत माझ्याकडे जे व्हिडीओ आलेत त्यामध्ये विद्यार्थींनी आम्हाला वाचवा-वाचवा असे ओरडत होते. त्याचा आम्ही निषेध करतो. देशातील अन्य भागातही विद्यार्थी निदर्शने करतात. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोलकाता, सूरत, वाराणसी, बिहार, औरंगाबाद, कानपूर, मुंबई याठिकाणीही प्रदर्शन होत आहेत. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. पंतप्रधान मोदी सांगतात हे सर्व काँग्रेस पक्ष करतोय, जर काँग्रेसमध्ये इतकी ताकद असती तर तुम्ही सत्तेत नसता. या आंदोलनाला सत्ताधारी पक्ष जबाबदार आहे असा आरोप काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केला.  

टॅग्स :agitationआंदोलनcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकHome Ministryगृह मंत्रालयcongressकाँग्रेसBJPभाजपा