शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

देशात NDA पुन्हा सत्तेत तर INDIA आघाडीच्या पदरी निराशा?; सर्व्हेतून आकडेवारी समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2023 09:01 IST

मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला ४२ टक्के, इंडिया आघाडीला ३८ टक्के आणि इतरांना २० टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली - Survey On Loksabha Election ( Marathi News ) पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमुळे देशातील राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे. या निवडणुकीत भाजपाप्रणित NDA आणि काँग्रेससह INDIA आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळेल. दोन्हीही आघाड्या निवडणुकीत आपलाच विजय होईल असा दावा करत आहेत. त्यात लोक कुणाला साथ देतील हा खरा प्रश्न आहे. कुणाला किती जागा मिळणार? त्यावरून एक सर्व्हेसमोर आला आहे. त्यात एनडीएला ४० टक्के तर इंडिया आघाडीला ३५ टक्क्याहून अधिक मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ओपिनियन पोलनुसार, विरोधकांच्या इंडिया आघाडीला निवडणुकीत फटका बसू शकतो. भाजपा नेतृत्वाखालील एनडीए पुन्हा तिसऱ्यांदा बहुमतात सरकार बनवू शकते. सर्व्हेत एनडीएच्या पारड्यात २९५ ते ३३५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर इंडिया आघाडीला लोकसभेच्या ५४३ जागांपैकी १६५ ते २०५ जागांवर विजय मिळू शकतो. त्याशिवाय ३५ ते ६५ जागा इतरांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मतांची टक्केवारी पाहिली तर एनडीएला ४२ टक्के, इंडिया आघाडीला ३८ टक्के आणि इतरांना २० टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

इंडिया आघाडीत कोणते पक्ष सहभागी?विरोधकांनी बनवलेल्या इंडिया आघाडीत प्रामुख्याने काँग्रेस, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा टीएमसी, बिहारच्या नितीश कुमारांचा जेडीयू. डिएमके, आम आदमी पार्टी, आरजेडी, उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि डाव्या पक्षांसह एकूण २८ पक्ष समाविष्ट आहेत. 

तर एनडीएमध्ये भाजपा, एकनाथ शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, जेडीएस यासह अन्य पक्ष आहेत. याशिवाय एनडीए आणि इंडिया या दोन्ही आघाडीत सहभागी नसलेले असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम, केसीआर यांची भारत राष्ट्र समिती पार्टी, टीडीपी, बीजेडीसह अन्य पक्ष आहेत. जर पुढील होणाऱ्या निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले तर देशात भाजपाची विजयाची हॅट्रीक होईल. मात्र लोक आपल्याला साथ देतील असा विश्वास इंडिया आघाडीच्या नेत्यांना आहे. 

महाराष्ट्रात कोणाचे पारडे जड?लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी