कॉ. पानसरे हल्ला निषेध - प्रतिक्रिया-३
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:21+5:302015-02-16T21:12:21+5:30
प्रत्येक पुरोगामी कार्यकर्त्यावरील हल्ला

कॉ. पानसरे हल्ला निषेध - प्रतिक्रिया-३
प रत्येक पुरोगामी कार्यकर्त्यावरील हल्ला गोविंदराव पानसरे महाराष्ट्र व देशातील विवेकी, सहिष्णू व धर्मनिरपेक्ष संस्कृतीचे तसेच कष्टकरी, कामकरी महिलांविषयक प्रश्न आणि राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा सर्वांगीण समस्येच्या पुरोगामी लढ्याचे ज्येष्ठ प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील हा हल्ला महाराष्ट्राचा शाहू, फुले, आंबेडकर प्रणीत पुरोगाम्यांवर झालेला हल्ला आहे. आपण सारेच पुरोगामी, खरे तर पानसरेच आहोत. त्यामुळे हा हल्ला आपल्यापैकी प्रत्येकावरच आहे आणि त्याचा प्रत्येकाने तीव्र धिक्कार केला पाहिजे. श्रीपाद भालचंद्र जोशी संयोजक - महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी व प्रगतिशील लेख संघाचे महाराष्ट्राचे कार्यवाह हल्ल्यामुळे लढाई थांबणार नाही कॉ. गोविंद पानसरे यांच्यासारख्या वयोवृद्ध कम्युनिस्ट नेत्यावर झालेल्या भ्याडहल्ल्याचा कुणीही पुरोगामी विचारवंत धिक्कारच करेल. अद्याप या हल्ल्यामागचे खरे सूत्रधार गवसायचे असल्यामुळे कोणताही राजकीय निष्कर्ष घाईघाईने काढणे योग्य होणार नाही. पण एवढे मात्र नक्की की, ज्या धनदांडग्यांविरुद्ध आणि कट्टरवाद्यांविरुद्ध आयुष्यभर एल्गार केला त्यांच्याविरुद्ध ना पानसरे पती-पत्नींची लढाई थांबणार ना कम्युनिस्ट पक्षासह धर्मनिरपेक्षवाद्यांची लढाई थांबणार. मी पानसरे पती-पत्नी लवकर बरे होण्याची कामना करतो. वि.स. जोग ज्येष्ठ समीक्षक व विचारवंत हल्ला निषेधार्हच गोविंद पानसरे हे दलित, श्रमिक चळवळीतील प्रसिद्ध नेतृत्व आहे. पुरोगामी चळवळीचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर झालेला हा हल्ला निषेधार्हच आहे. भारतीय संविधानावर ज्यांचा विश्वास नाही, अशा लोकांनीच हा हल्ला घडवून आणला असावा, असा संशय असून सरकारने आरोपींना तातडीने अटक कारावी व शिक्षा ठोठवावी. विलास भोंगाडे संयोजक - गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती