कॉ. पानसरे हल्ला निषेध-प्रतिक्रिया-२

By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:06+5:302015-02-16T21:12:06+5:30

सरकारसाठी लांच्छनास्पद

C. Pansare attack prohibition-reaction-2 | कॉ. पानसरे हल्ला निषेध-प्रतिक्रिया-२

कॉ. पानसरे हल्ला निषेध-प्रतिक्रिया-२

कारसाठी लांच्छनास्पद

कॉ. गोविंद पानसरे हे महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ राजकीय नेते, विचारवंत आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, श्रमिकांची दयनीय अवस्था, सध्याच्या सरकारच्या खासगीकरणाची धोरणे, त्यातून निर्माण होणारे टोलचे प्रश्न याविरुद्धच्या लढ्यात नेतृत्व केले. अशा नेतृत्वावर बंदुकीचा हल्ला होणे आणि हल्लेखोर पकडले न जाणे, ही सरकारला लांच्छनास्पद गोष्ट आहे. समाजात परिवर्तन घडून येऊ न देणारे बेडर झाले आहेत.तेव्हा मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा छडा लावावा. पुरोगामी कार्यकर्त्यांवर हल्ले होणार नाही, यासाठी सर्वच सामाजिक कार्यकर्त्यांनी एकीने कार्य करावे लागेल. पानसरे दाम्पत्य या हल्ल्यातून लवकर बरे होवो, ही शुभेच्छा.
डॉ. श्रीनिवास खांदेवाले
अर्थतज्ज्ञ

धर्मांध शक्तींचा आततायीपणा वाढला आहे

नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेला हल्ला ज्या विचारांनी केला आहे, त्यातूनच कॉ. गोविंद पानसरे दाम्पत्यावर सुद्धा हल्ला झाला आहे, असे माझे पक्के मत आहे. केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यापासून देशात धर्मांध शक्तींचा आततायीपणा अधिक वाढला आहे. या शक्तींना रोखण्याबाबत सरकारची भूमिकासुद्धा संशयास्पद दिसून येते. हा हल्ला निंदनीय आहेच. हल्लेखोरांना तातडीने पकडून शिक्षा व्हावी.
मोहनदास नायडू
ज्येष्ठ नेते : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष

हल्लेखोरांना कठोर शिक्षा करा

ज्येष्ठ विचारवंत व फुले,शाहू,आंबेडकर चळवळीतील खंदे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या नराधमांना त्वरित अटक करण्यात यावी व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. पुण्यातील नरेंद्र दाभोलकर यांची करण्यात आलेली हत्या व कॉ. पानसरे यांच्यावर करण्यात आलेला हल्ला हा जातीय सांप्रदायिक शक्तींनी घडवून आणला असावा, असा संशय आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या राष्ट्रद्रोही समाजकंटकांना आता जनतेनेही धडा शिकवण्याची तयारी ठेवावी.
आ. प्रा. जोगेंद्र कवाडे
अध्यक्ष - पीपल्स रिपब्लिकन पार्टी


दाभोलकरांची हत्या करणाऱ्यांचाच हल्ला

नरेंद्र दाभोललर यांची हत्या करणाऱ्या लोकांनीच कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला केला आहे, असे आमचे स्पष्ट मत आहे. हा हल्ला म्हणजे पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रतिगामी शक्तींनी दिलेला इशारा आहे. पुरोगामी विरोधात प्रतिगामी या लढाईतूनच हा हल्ला झाला आहे. या हल्ल्यातून पानसरे दाम्पत्य लवकर बरे होवोत.
डॉ. सुरेश खैरनार
सामाजिक कार्यकर्ते

Web Title: C. Pansare attack prohibition-reaction-2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.