शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत तीन माजी मुख्यमंत्र्यांचे पुत्र आमने-सामने 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 14:36 IST

पोटनिवडणुकीत शिमोगा लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार ठरणार आहे. कारण या मतदार संघामध्ये तीन माजी मुख्यमंत्र्याचे पुत्र आमने-सामने आले आहेत. 

बंगळुरू - सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे देशातील राजकीय पारा चढलेला आहे. तर कर्नाटकमध्येही तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. शिमोगा, बेल्लारी आणि मांड्या या लोकसभा तर रमणग्राम आणि जामखंडी या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक रंगणार आहे. या पोटनिवडणुकीत शिमोगा लोकसभा मतदारसंघातील लढत रंगतदार ठरणार आहे. कारण या मतदार संघामध्ये तीन माजी मुख्यमंत्र्याचे पुत्र आमने-सामने आले आहेत. बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने शिमोगा लोकसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली आहे. येथील पोटनिवडणुकीसाठी भाजपाने येडियुरप्पा यांचे पुत्र बी. राघवेंद्र यांना मैदानात उतरवले आहे. तर काँग्रेस आणि जेडी (एस) आघाडीकडून माजी मुख्यमंत्री एस. बांगरप्पा यांचे पुत्र मधु बांगरप्पा यांना तिकीट देण्यात आले आहे. या दोघांमध्येच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. मात्र कर्नाटकचे अजून एक माजी मुख्यमंत्री जे. एच. पटेल यांचे पुत्रा महिमा पटेल यांना जनता दल (यू) पक्षाने उमेदवारी दिल्याने येथील निवडणूक तिरंगी झाली आहे. दरम्यान, तीन लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीपैकी शिमोगा आणि बेल्लारी मतदारसंघातील निवडणूक भाजपासाठी प्रतिष्ठेची आहे. तर मांड्या मतदारसंघातमध्ये जनता दल (एस) पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या पोटनिवडणुकीकडे पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकमधील भाजपा आणि काँग्रेस-जेडी (एस) आघाडी यांच्यातील सेमीफायनल म्हणून पाहिजे जात आहे. यापैकी शिमोगा आणि बेल्लारी मतदारसंघात विजय मिळवल्यास भाजपासाठी कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीची वाट सोपी होणार आहे. तर पराभव झाल्यास भाजपाच्या अडचणीत अजून वाढ होईल.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेस