शहरात घर घेताय? कर्जावरील व्याजात मिळणार सवलत, केंद्र आणणार याेजना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 05:09 IST2023-09-01T05:09:44+5:302023-09-01T05:09:59+5:30
मनोज जोशी म्हणाले, शहरांमध्ये घरे खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना कर्जावरील व्याजात सवलत देण्यासाठीची योजना सप्टेंबरमध्ये सुरू केली जाईल.

शहरात घर घेताय? कर्जावरील व्याजात मिळणार सवलत, केंद्र आणणार याेजना
नवी दिल्ली : शहरात स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना गृहकर्जावरील व्याजात सवलत देण्यासाठी पुढील महिन्यात म्हणजे सप्टेंबरमध्ये एक योजना आणली जाईल, असे केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहारमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले. या योजनेची
रूपरेषा तयार केली जात आहे, असे पुरी यांनी गुरुवारी सांगितले.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी म्हणाले, शहरांमध्ये घरे खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांना कर्जावरील व्याजात सवलत देण्यासाठीची योजना सप्टेंबरमध्ये सुरू केली जाईल. पंतप्रधानांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात शहरात राहणाऱ्या व ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही अशा मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी या योजनेची घोषणा केली होती. शहरांमध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आम्ही लवकरच एक योजना आणू, असे मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात म्हटले होते.