शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 17:42 IST

Lalit Modi : आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी यांनी भावाला आईच्या सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.

Modi Family Dispute : काही दिवसांपूर्वी संपत्तीच्या वादातून रेमंडचे गौतम सिंघानिया आणि विजयपत सिंघानिया यांच्यातील भांडण फार चर्चेत होतं. त्यानंतर गौतम सिंघानिया यांनी त्यांच्या वडिलांना घरी आणून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आणि वादावर पडदा पडला. मात्र आता आणखी एका कुटुंबाचा संपत्तीचा वाद सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. भारतीय व्यावसायिक क्षेत्रात मोठे नाव असलेल्या दिवंगत केके मोदी कुटुंबाच्या ११,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेबाबतचा कौटुंबिक वाद दिवसेंदिवस वाढत आहे. पण आता या प्रकरणामध्ये उद्योगपती ललित मोदी यांचा भाऊ आणि गॉडफ्रे फिलिप्सचे कार्यकारी संचालक समीर मोदी यांनी त्यांची आई बीना मोदी यांच्यावर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी आपल्या भावावर आईमार्फत हल्ला झाल्याचे म्हटलं आहे. हा हल्ला इतका जीवघेणे होता की ललित मोदी यांच्या  भावाचा हात आता कायमचा तुटला आहे. समीर मोदी यांनी शुक्रवारी शुक्रवारी दिल्ली पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की, कुटुंबात सुरू असलेल्या संपत्तीच्या वादातून आई बिना मोदी यांनी त्यांच्यावर हल्ला केला आहे. समीर मोदी यांनी त्यांची आई, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि ग्रँडफ्रे फिलिप्सच्या इतर संचालकांवर गंभीर दुखापत केल्याचा आरोप केला. त्यानंतर आता ललित मोदी यांनी भाष्य केलं आहे.

के.के. मोदी यांच्या निधनानंतर मोदी एंटरप्रायझेस ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्यात. या कुटुंबात सुमारे ११ हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेवरून वाद सुरू आहे. अशातच आता समीर मोदी यांनी आई बीना मोदी यांना मारहाण केल्याचा आरोप केला. समीर मोदींनी आरोप केला की, जेव्हा ते कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी आले तेव्हा त्याच्या आईने तिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याच्यावर हल्ला करायला लावला. या हल्ल्यात समीर मोदी गंभीर जखमी झाले. यानंतर ललित मोदी यांनी समीर मोदींच्या दाव्याचे समर्थन केलं आहे.

ललित मोदींनी समीर यांची प्लॅस्टर केलेल्या हाताचे हॉस्पिटलमधील फोटो शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या भावाला या अवस्थेत पाहून मनाला खुप दुःख झालं. एका आईने तिच्या सुरक्षा रक्षकाद्वारे मुलाला त्याचा हात कायमचा निकामी होईल अशा प्रकारे मारहाण करणे धक्कादायक आहे. मीटिंगला हजर राहणे हे त्याचे एकमेव पाप होते. या अपराधासाठी सर्व बोर्ड सदस्य दोषी आहेत. माझ्या सहवेदना समीर मोदीसोबत आहेत,” असे ललित मोदी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या सगळ्या प्रकारावर समीर मोदी यांनीही भाष्य केलं. "माझ्याच ऑफिसमध्ये माझ्यावर हल्ला होईल, असे मला कधीच वाटले नव्हते. कंपनी संदर्भातील प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. पण आता मी माझे स्टेक अजिबात विकणार नाही. मला बोर्डातून काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो पूर्ण होणार नाही," असे समीर मोदी यांनी म्हटलं.

टॅग्स :Lalit Modiललित मोदीbusinessव्यवसायCrime Newsगुन्हेगारी