गळ्यात वाघनखाचं लॉकेट घालून इन्स्टावर स्टाईल मारणं पडलं महागात, बिझनेसमन अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 14:14 IST2025-01-21T14:09:23+5:302025-01-21T14:14:25+5:30
Tamil nadu: तामिळनाडूमधील कोईंबतूर येथील एका व्यावसायिकाला रविवारी वनअधिकाऱ्यांनी अटक केली. बालाकृष्णन असं त्यांचं नाव आहे.

गळ्यात वाघनखाचं लॉकेट घालून इन्स्टावर स्टाईल मारणं पडलं महागात, बिझनेसमन अटकेत
तामिळनाडूमधील कोईंबतूर येथील एका व्यावसायिकाला रविवारी वनअधिकाऱ्यांनी अटक केली. बालाकृष्णन असं त्यांचं नाव आहे. पुलियाकुलम येथील बालाकृष्णन यांनी काही दिवसांपूर्वी एका युट्युबरला इन्स्टाग्रामसाठी दिलेल्या मुलाखतीत केलेल्या दाव्यानंतर अटक करण्यात आली आहे. मुलाखतीवेळी त्यांनी गळ्यात एक लॉकेट घातलं होतं. हे वाघनख असल्याचा दावा त्यांनी केला होता.
मुलाखतीवेळी बालाकृष्णह ने गळ्यात घातलेलं आपलं टायगर क्लॉ पेंडेंट दाखवत होते. तसेच हे काय आहे असं विचारल्यावर त्यांनी मी सार्वजनिकपणे याबाबत काही सांगू शकत नाही, अस सांगितलं. ते म्हणाले की, हे वाघनख आहे. तसेच ते आंध्र प्रदेश येथून मिळालं आहे. मात्र मी याची शिकार केलेली नाही.
त्यानंतर सदर युट्युबरने त्यांना विचारलं की, ते नट्टमई (सरपंच) आहेत, तेव्हा त्यांनी सांगितले की, मी सेंडोज थेवर समुदायामधील आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वादाला तोंड फुटलं. त्यानंतर वनअधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली.