शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅटफॉर्मवर बसलेल्या प्रवाशांसाठी काळ बनली बस, 3 जणांना चिरडलं; VIDEO पाहून अंगावर शहारा येईल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 14:13 IST

मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) जारी करण्यात आलेल्या  एका पत्रकात, मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही म्हण्यात आले आहे.

आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील पंडित नेहरू बस स्थानकात आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (APSRTC) बस अचानकपणे प्लॅटफॉर्मवर चढली आणि तेथे वाट बघत बसलेले तीन लोक या अपघातात चिरडले गेले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी या घटनेसंदर्भात शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना 10-10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज सकाळी आठ वाजून 20 मिनिटांच्या सुमारास घडला. यात, आरटीसीची एक बस प्लेटफॉर्म क्रमांक 12 वर चढली आणि तील लोकांना चिरडले. या अपघातात जखमी झालेल्या एका 18 माहिन्याच्या चिमुकलीचा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. प्रादेशिक व्यवस्थापक एम. येसू दनम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'वाहन मागे घेण्याऐवजी चालकाकडून ते पुढे गेले आणि अपघात घडला.

याप्रकरणी मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांनी पीडितांच्या कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करत, जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयाकडून (सीएमओ) जारी करण्यात आलेल्या  एका पत्रकात, मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचेही म्हण्यात आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातAndhra Pradeshआंध्र प्रदेशBus DriverबसचालकDeathमृत्यू