बस दरीत कोसळली; १४ ठार
By Admin | Updated: May 9, 2016 03:23 IST2016-05-09T03:23:37+5:302016-05-09T03:23:37+5:30
हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील जोगिंदरनगरजवळ शनिवारी रात्री हिमाचल मार्ग परिवहन महामंडळाची एक बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १४ प्रवासी ठार आणि ३९ जखमी झाले

बस दरीत कोसळली; १४ ठार
सिमला : हिमाचल प्रदेशच्या मंडी जिल्ह्यातील जोगिंदरनगरजवळ शनिवारी रात्री हिमाचल मार्ग परिवहन महामंडळाची एक बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात १४ प्रवासी ठार आणि ३९ जखमी झाले.
रेकाँग पियोकडे जाणाऱ्या या बसमध्ये ५५ प्रवासी होते. सिमल्यापासून २१० कि. मी. अंतरावर हा अपघात घडला. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना हिमाचल सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.