कचर्याला दिला जातोय पेटवून
By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:14+5:302015-02-16T23:55:14+5:30
पुणे : शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्यामुळे नागरिक त्रस्त होवू लागले आहेत. कचर्याचे ढीग पालिका उचलत नसल्याने आता नागरिक हा कचरा पेटवून देवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात अग्निशामक दलाकडे कचरा पेटल्याचे २० ते २५ कॉल आले होते. मागील काही दिवसांपासून दररोज किमान एवढेच कॉल येत असल्याचे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.

कचर्याला दिला जातोय पेटवून
प णे : शहरात ठिकठिकाणी साठलेल्या कचर्यामुळे नागरिक त्रस्त होवू लागले आहेत. कचर्याचे ढीग पालिका उचलत नसल्याने आता नागरिक हा कचरा पेटवून देवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात अग्निशामक दलाकडे कचरा पेटल्याचे २० ते २५ कॉल आले होते. मागील काही दिवसांपासून दररोज किमान एवढेच कॉल येत असल्याचे अग्निशामक दलातर्फे सांगण्यात आले.पालिकेकडून कचरा उचलला जात नसल्याने ठिकठिकाणी ढीग वाढत चालले आहेत. त्यामुळे त्यापरिसरात दुर्गंधी वाढली असून कचरा नागरिकांच्या घरापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे काही नागरिक वैतागून कचरा पेटवू लागले आहेत. मागील काही दिवसांपासून अग्निशामक दलाला दररोज कचर्याच्या ढीगाला आग लागल्याचे कॉल येत आहेत. दिवसेंदिवस हे कॉल वाढतच चालले आहेत. अग्निशामक दलाने दिलेल्या माहितीनुसार, कचरा उचलला जात नसल्याने कचर्याला आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. संपुर्ण शहतातूनच तसे कॉल येवू लागले आहेत. सोमवारी दिवसभरात २० ते २५ कॉल आले. रात्रीही कॉल येत असतात. कचरा असाच साचून राहिल्यास आग लावण्याचे प्रकार आणखी वाढण्याची शक्यता आहे. --------------