जादू दाखवतो म्हणत तरुणाला संध्याकाळी जमिनीत गाडलं; सकाळी पुन्हा खड्डा खणला तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 18:41 IST2021-09-12T18:41:21+5:302021-09-12T18:41:49+5:30
१२ तास तरुण खड्ड्यात जिवंत राहील असा दावा करण्यात आला होता; सकाळी पुन्हा खड्डा खणण्यात आला, तेव्हा सगळ्यांना धक्का बसला

जादू दाखवतो म्हणत तरुणाला संध्याकाळी जमिनीत गाडलं; सकाळी पुन्हा खड्डा खणला तेव्हा...
पाटणा: बिहारची शेखपुरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. जादूचा प्रयोग एका तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शेखोपूरसरायमधील वीरपूर गावात हा प्रकार घडला. जादूच्या प्रयोगादरम्यान मृत्यूमुखी पडलेला तरुण याच गावचा आहे. त्याचं नाव धीरज रविदास होतं. तो १८ वर्षांचा होता. रविदासला जमिनीत गाडून १२ तासांनी त्याला जिवंत बाहेर काढण्याचा दावा जादूगारानं केला होता. १२ तासांनी पुन्हा खड्डा खणण्यात आला, त्यावेळी रविदासचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर रविदासच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
जादूचे प्रयोग करूनच धीरज रविदासचं घर चालतं. रविदास स्वत: जादू दाखवायचा. शुक्रवारी रात्री तो मधेपूर गावात आपल्या सहकाऱ्यांसह जादूचे खेळ दाखवत होता. त्यात त्याच्या कुटुंबातल्या सदस्यांचादेखील समावेश होता. रविदासला जमिनीखाली गाडून १२ तासांनंतर त्याला जिवंत बाहेर काढण्यात येईल असा दावा करण्यात आला. शुक्रवारी संध्याकाळी रविदासला खड्डा खणून गाडण्याल आलं. शनिवारी सकाळी त्याला बाहेर काढण्यासाठी पुन्हा खड्डा खणण्यात आला. मात्र रविदासचा मृत्यू झाला होता.
दोन लहानग्यांची गळे कापून निर्घृण हत्या; शेतात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ
धीरज रविदासच्या मृत्यूची माहिती मिळताच वीरपूर गावावरून त्याचे नातेवाईक मधेपूरला पोहोचले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बरबीघा पोलीस ठाण्याचे प्रभारी पथकासह दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताच रविदासच्या वडिलांनी आणि सरपंचांनी विरोध केला. त्यामुळे पोलिसांना मृतदेहाशिवाय तिथून निघावं लागलं. या प्रकरणात मृताच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही.