धक्कादायक! दोन लहानग्यांची गळे कापून निर्घृण हत्या; शेतात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2021 05:43 PM2021-09-12T17:43:21+5:302021-09-12T17:43:34+5:30

मृतांची ओळख न पटल्यानं पोलीस तपासात अडथळे; परिसरात भीतीचं वातावरण

double murder in uttar pradesh dead bodies of two children found in sugarcane field | धक्कादायक! दोन लहानग्यांची गळे कापून निर्घृण हत्या; शेतात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ

धक्कादायक! दोन लहानग्यांची गळे कापून निर्घृण हत्या; शेतात मृतदेह आढळल्यानंतर एकच खळबळ

Next

बहराईच: उत्तर प्रदेशातल्या बहराईचमध्ये शेतात दोन चिमुरड्यांचे मृतदेह आढळून आल्यानं परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन्ही चिमुरड्यांची गळे कापून निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. मृतांमध्ये एका मुलाचा आणि एका मुलीचा समावेश आहे.

बहराईचमधल्या फखरपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७ ला जोडणाऱ्या गजाधरपूर-बसंता रस्त्याच्या शेजारी असलेल्या ऊसाच्या शेतात दोन मृतदेह आढळून आले. याबद्दलची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. फखरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश कुमार घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन प्रकरणाचा तपास सुरू केला. 

तू मला का मारलंस, आता मी हिला मारणार! निर्दयी सुनेनं सासूच्या कानशिलात लगावल्या

पोलीस अधीक्षक सुजाता सिंह यांनीदेखील घटनास्थळाचा आढावा घेतला. आरोपींना अटक करण्यासाठी त्यांनी दोन पथकं तयार केली आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आदेश सिंह यांनी दिले आहेत. मात्र मृतदेहांची ओळख न पटल्यानं पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मृतांमध्ये १० वर्षांच्या मुलीचा आणि ८ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. दोघांना दुसऱ्या ठिकाणाहून आणून रात्री त्यांची हत्या करण्यात आली असावी अशा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी श्वान पथकाची मदत घेतली. लवकरच हत्येचं गूढ उकलण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.

Web Title: double murder in uttar pradesh dead bodies of two children found in sugarcane field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.