मध्यप्रदेशमधील पाकीझा मॉलमध्ये भीषण आग, 7 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 09:08 IST2018-10-09T08:10:09+5:302018-10-09T09:08:48+5:30
मध्यप्रदेशच्या बुरहानपूरमधील पाकीझा मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 7 जण जखमी झाले आहेत.

मध्यप्रदेशमधील पाकीझा मॉलमध्ये भीषण आग, 7 जण जखमी
बुरहानपूर : मध्यप्रदेशच्या बुरहानपूरमधील पाकीझा मॉलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 7 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
Burhanpur: Around 7 people injured in a fire that broke out at Pakiza mall late last night. 7 fire tenders present at the spot. More details awaited. #MadhyaPradeshpic.twitter.com/DyqbCM5R88
— ANI (@ANI) October 8, 2018
मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे. रात्रीच्या सुमारास आग लागली त्यावेळी सात कर्मचारी आतमध्ये असल्याने ते जखमी झाले. जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या.