राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडले; धनखड यांनी सदस्याचे नाव घेतले, चौकशी सुरु...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:36 IST2024-12-06T11:35:11+5:302024-12-06T11:36:19+5:30

Rajya sabha money Bundle Row: संसदेत विरोधकांच्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन करत आहेत.

Bundles of notes found on bench of Congress MPs in Rajya Sabha; Investigation begins... | राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडले; धनखड यांनी सदस्याचे नाव घेतले, चौकशी सुरु...

राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडले; धनखड यांनी सदस्याचे नाव घेतले, चौकशी सुरु...

संसदेत विरोधकांच्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन करत आहेत. त्यातच राज्यसभेत मोठी खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. काँग्रेस सदस्यांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडल्याने खळबळ उडाली आहे. 

काँग्रेसचे राज्यसभा सदस्य अभिषेक मनु सिंघवी यांना अलॉट केलेल्या बाकावर हे नोटांचे बंडल मिळाले आहे. गुरुवारी राज्यसभेचे कामकाज थांबविल्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी आपल्याला ही माहिती दिल्याचे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी सांगितले. यामुळे मोठा गोंधळ सुरु झाला आहे. 

हा गंभीर प्रकार असून याची चौकशी केली जात असल्याचे धनखड यांनी सभागृहात जाहीर केले. सीट नंबर 222 वर हा पैसा सापडला आहे. ही सीट तेलंगानाचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. 

या प्रकरणावर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांची प्रतिक्रिया आली आहे. नियमित प्रोटोकॉलनुसार, सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर तोडफोड विरोधी पथकाने सभागृहाची तपासणी केली. यावेळी नोटा सापडल्या, सीट क्रमांक पाहिला गेला, त्यानुसार मस्टर पाहिले गेले तर त्या क्रमांकाच्या सदस्यांची सही होती. सभापतींनी सदस्याचे नाव घेऊ नये, यावर आक्षेप का असावा, हे समजत नाही. सभापतींनी आसन क्रमांक आणि त्या विशिष्ट आसन क्रमांकावर बसलेल्या सदस्याचे नाव बरोबर सांगितले आहे. यात चूक काय? गांभीर्याने चौकशी व्हायला हवी आणि सदस्यांनी उपस्थित केलेल्या चिंता अगदी वास्तविक आहेत, असे रिजिजू म्हणाले. 

तर ही घटना गंभीर स्वरूपाची असल्याचे केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी राज्यसभेत सांगितले. त्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे, असे ते म्हणाले.

Web Title: Bundles of notes found on bench of Congress MPs in Rajya Sabha; Investigation begins...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.