बुलेट ट्रेननेही जाता येईल चीनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2018 04:23 IST2018-09-13T04:23:29+5:302018-09-13T04:23:46+5:30
चीनमधील कुनमिंग व कोलकाता ही शहरे बुलेट ट्रेनने जोडण्याचा चीनचा प्रस्ताव आहे.

बुलेट ट्रेननेही जाता येईल चीनमध्ये
कोलकाता : चीनमधील कुनमिंग व कोलकाता ही शहरे बुलेट ट्रेनने जोडण्याचा चीनचा प्रस्ताव आहे. तो प्रत्यक्षात आल्यास कोलकाताहून चीनमध्ये अवघ्या काही तासांत पोहोचता येईल. हा मार्ग म्यानमार व बांगलादेशमधूनही जाणार असल्याची माहिती चीनचे कोलकाता येथील महावाणिज्य दूत मा झान्वू यांनी बुधवारी एका परिषदेत दिली. ते म्हणाले की, या २८०० कि.मी.च्या मार्गावर औद्योगिक प्रकल्पांचे जाळेही विणले जाऊ शकते. त्याचा प्रकल्पात सहभागी सर्वच देशांना फायदा
होईल.